DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ फेरीबोट उलटली!

८० पैकी तिघांचा मृत्यू! मदत व बचाव कार्य सुरू

DD News Marathi by DD News Marathi
December 18, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ फेरीबोट उलटली!

मुंबई प्रतिनिधी:
दि. १८ डिसेंबर २०२४

गेट वे ऑफ इंडियाजवळ एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघातावेळी या बोटीत ८० प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली. घटनेची माहिती मिळताच नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले.

या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्यांकडे जात होती. तेव्हा नेव्हीच्या एका स्पीड बोटीने नीलकमल फेरीबोटला धडक दिली. या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते.

या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर येत आहे. ज्यात प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने धडक दिली त्यानंतर नीलकमल नावाची प्रवासी बोट उलटली. दरम्यान ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पीड बोटीने आधी नीलकमलला एक फेरी मारली आणि त्यानंतर थोडी लांब जाऊन पुन्हा परत येताना तिला थेट येऊन धडक दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

स्पीड बोटीने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हा त्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला. ही धडक इतकी जोरात होती की ज्यामुळे प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बोट उलटली असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत माहिती दिली.

मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #boataccident#eliphantaacaves#gatewayofindia#neelkamal
Previous Post

आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बिनविरोध निवड!

Next Post

रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

Next Post
रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.