DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

गाबा कसोटीनंतर होणार निवृत्त. भारतीय चाहत्यांना मोठा धक्का.

DD News Marathi by DD News Marathi
December 19, 2024
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२४

गाबा कसोटीचा निकाल लागताच रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आर. अश्विन गाबा कसोटीत पावसामुळे सामना थांबला होता तेव्हा विराट कोहलीबरोबर बोलताना खूप भावुक झालेला दिसला. विराट त्याला मिठी मारत त्याचं सांत्वन करताना दिसला. ज्याचा व्हीडिओही व्हायरल होताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती आणि सामना संपताच त्याने निवृत्ती जाहीर केली.

भारताचा फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरलेला आहे.

या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. गाबा कसोटी दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन निवृत्ती जाहीर केली.

अश्विनचे निवृत्ती जाहीर करताना भावविवश!
“आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी माझ्यासोबत आहेत”, असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले.

तो पुढे म्हणाला, “साहजिकच, खूप जणांचे आभार मानायचे आहेत. पण, जर मी बीसीसीआय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात कमी पडेन. मला त्यांच्यापैकी काही जणांची आणि सर्व प्रशिक्षकांची नावे सांगायची आहेत. रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा ज्यांनी हे सर्व झेल स्लिपमध्ये घेतले आणि मला त्या विकेट मिळवण्यात मदत केली, त्यांचा मी आभारी आहे. मी आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. हा खूपच भावुक करणारा प्रसंग आहे.”

रविचंद्रन अश्विनची कसोटी कारकीर्द
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ३७ वेळेस ५ विकेट आहेत आणि ८ वेळा सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी-२० मध्ये ७२ विकेट घेतल्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ७६५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३५०३ धावा आहेत आणि त्याने एकूण ६ कसोटी शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण ८ शतकं होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Gabacrickettest#RAshwin#RAshwinretires
Previous Post

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ फेरीबोट उलटली!

Next Post

‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांचा हल्लाबोल!

Next Post
‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांचा हल्लाबोल!

‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांचा हल्लाबोल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.