DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांचा हल्लाबोल!

विधानभवन परिसरात विरोधकांचे आंदोलन.

DD News Marathi by DD News Marathi
December 19, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांचा हल्लाबोल!

नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२४

‘महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट’यासारख्या विविध घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवन परिसरात रॅली काढत महायुती सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

परभणी आणि बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना वाचविण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले. सत्ता महायुतीची – पाठराखण हत्येतील आरोपींची, हत्येतील आरोपीचे साथीदार – असंवेदनशील महायुती सरकार.. अशा आशयाचे फलक झळकवीत विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी केली.

या आंदोलनात भाई जगताप, सचिन अहिर, नाना पटोले, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, राहुल पाटील, सचिन भोईर, आदींचा समावेश होता. आंदोलनादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, “परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला. तर बीडमधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणांत सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत”.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ambadasdanve#beedmurdercase#legislativecouncil#nagpurwintersession#parbhani$oppositionprotest
Previous Post

रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना मोठा धक्का!

Next Post

महायुती सरकारचा नव्या महाराष्ट्राचा संकल्प!

Next Post
महायुती सरकारचा नव्या महाराष्ट्राचा संकल्प!

महायुती सरकारचा नव्या महाराष्ट्राचा संकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.