ठाणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.२७ मे २०२१
आजन्म कारावास शिक्षा भोगत असलेला उल्हासनगरचा डॉन व बाहुबली नेता पप्पु कलानी याला न्यायालयाने दीड महिन्यासाठी पॅरोलवर घरी सोडले आहे. या आधी त्याला त्याची पत्नी माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाल्यावर १५ दिवसांकरिता पॅरोल सोडविण्यात आले होते. पुन्हा एकदा तो घरी परतल्याने उल्हासनगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या सुरेश ऊर्फ पप्पु कलानी नाशिक येथील कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. मात्र, त्यास आधी १५ दिवस व आता ४५ दिवस असे दोन वेळा पॅरोल वर सोडण्यात आले आहे. सन २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने त्याची पत्नी ज्योती कलानी यांना तिकिट न दिल्याने त्याचा मुलगा ओमी कलानी व त्याची टिम भाजप पासून दूर आहे. त्यामूळे पुढील काळात होणारी महानगरपालिकेची निवडणूक व ओमी कलानी यांची राजकीय वाटचाल याविषयी पप्पु कलानी नक्कीच काही दिशा ठरवतील.
कोण आहे, पप्पु कलानी.
पप्पु कलानी हा उल्हासनगर मधील राजकीय नेता व डॉन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यावर आजपर्यंत तब्बल १९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे हे खुनाचे आरोप असलेले आहेत. तो १९८० च्या दशकात टोळी प्रमुख काम करीत होता. त्याचे काका उल्हासनगर मधील काँग्रेसचे नेते होते. तो उल्हासनगर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून सर्वप्रथम निवडून आला होता, पुढे तो शहराचा महापौर ही बनला. सन १९९० साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तो आमदार म्हणून सर्वप्रथम विजयी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर १९९२ साली टाडा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गुन्हेगारीच्या आरोपामूळे काँग्रेस पक्षाने त्याची पक्षातून हाकलपट्टी केली होती. सन १९९५ व ९९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत तो अपक्ष निवडून आला होता. सन २००४ साली तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आठवले यांच्या पक्षातून आमदार म्हणून विजयी झाला होता. १९९२ ते २००१ दरम्यान तरुंगात असताना ही दोन निवडणूका मोठ्या मताधिक्यानी जिंकला होता. सन २०१४ सालच्या निवडणूकीत त्याची पत्नी ज्योती कलानी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झाली होती. तेंव्हा, एक बाहुबली राजकीय नेता व उल्हासनगरचा डॉन म्हणून पप्पु कलानी याची ओळख आहे.
मुलगा ओमी कलानी याचा भाजप प्रवेश.
पप्पु कलानी याचा मुलगा ओमी कलानी सध्या राजकीय वारसदार म्हणून कामकाज पहात आहे. त्याने टिम ओमी नावाने एक संघटना ही सुरु केली आहे. सन २०१९ सालच्या निवडणूकीच्या अगोदर ओमी कलानी यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर ओमी कलानी याच्या पत्नीने ही महापौर म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेत काम केले आहे.