जळगाव प्रतिनिधी:
दि. २० डिसेंबर २०२४
मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन परत येत असताना मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास सावदा ते पिंपळ रस्त्यावर चारचाकी वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. शुभम सोनार (वय-२५) मुकेश रायपूरकर (वर-२३) व जयेश भोई अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील पाच मित्र भुसावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. भुसावळ कडून सावदा मार्गे रावेर कडे येत असताना त्यांच्या एमएच – २० सीएस – ८००२ गाडीने भरधाव वेगात झाडाला जोरदार टक्कर दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये होंडा कंपनीच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या अपघातात शुभम सोनार (वय-२५) मुकेश रायपूरकर (वर-२३) यांसह जयेश भोईचा मृत्यू झाला तर गणेश भोई , इतर 1 गंभीर जखमी असून जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.