नागपूर प्रतिनिधी :
दि. २० डिसेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेत गुरुवार १९ डिसेंबर रोजी पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ’ असे बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाचे नाव बदलण्यासाठी हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे देखील विधानसभेत स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला होता आणि तो विधानसभेने मंजूर केला. पुणे विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आधीच मंजूर केल्याचे देखील सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.
बातमी नक्की शेअर करा