डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २० डिसेंबर २०२४
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाल यांचं निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम इथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख होते. त्यांच्या निधनानं हरियाणाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चौधरी देवीलाल ताऊ हे हरियाणा आणि देशाच्या राजकारणात प्रसिद्ध होते. ते मागील काळात देशाचे उपपंतप्रधानही होते. देवीलाल यांच्या 5 मुलांपैकी ओमप्रकाश चौटाला हे चार मुलांपैकी एक होते. प्रताप चौटाला, रणजित सिंह आणि जगदीश चौटाला अशी त्यांच्या उर्वरित मुलांची नावे आहेत. जेव्हा देवीलाल उपपंतप्रधान बनले तेव्हा मोठा मुलगा ओमप्रकाश चौटाला यांनी राजकीय वारसा हाती घेतला आणि हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. ओमप्रकाश 1989 ते 1991 पर्यंत मुख्यमंत्री होते. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि येथून त्यांचा राजकीय प्रवास संथावला. 1999 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांनी भाजपच्या मदतीने हरियाणात सरकार स्थापन केले.
ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या 87 व्या वर्षी 10 वी आणि 12 वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. चौटाला यांनी 2019 मध्ये 10 वीची परीक्षा दिली होती, मात्र काही कारणांमुळे इंग्रजीचा पेपर देता आला नाही. इंग्रजी विषयाचा निकाल न लागल्याने हरियाणा शालेय शिक्षण मंडळानेही बारावीचा निकाल रोखून धरला होता. त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये 10वीचा इंग्रजीचा पेपर दिला, ज्यामध्ये त्यांना 88% गुण मिळाले. चौटाला यांनी वयाच्या 87 व्या वर्षी 10वी आणि 12वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती.
ओमप्रकाश चौटाला यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. अजय आणि अभय चौटाला. अजय आणि अभय चौटाला यांना दोन मुले आहेत. अजय चौटाला यांच्या मुलांची नावे दुष्यंत आणि दिग्विजय चौटाला आहेत. दोघेही राजकारणात आहेत. अभय चौटाला यांच्या मुलांची नावे कर्ण आणि अर्जुन चौटाला आहेत. दोघेही राजकारणात आहेत.