DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर दबाव आणला….”

शिंदे गटातील एका नेत्याचा खळबळजनक दावा.

DD News Marathi by DD News Marathi
December 21, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर दबाव आणला….”

नागपूर प्रतिनिधी :
दि. २१ डिसेंबर २०२४

काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे, असं दीपक केसरकर म्हणाले
मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, उद्धव ठाकरेंनी काय अपेक्षा बोलून दाखवली?

आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि त्यामुळे ते काँग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळे युती तुटली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अवाक्षर काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते ही शिवसेनेची ताकद होती. त्याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे. त्यांनी जनतेमध्ये जायला शकले पाहिजे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा वडील म्हणून मी त्यांना सल्ला देतो.’

“सरकारने गणवेश वाटपासंदर्भातील जुना निर्णय रद्द केला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरव्यवहार केला आहे. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करायला हवी. ही अनियमितता प्रशासकीय आहे की आर्थिक स्वरूपाची हे तपासायला हवे. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय गणवेशदेखील सोडला नाही. त्यातूनही मलाई खाण्याचा प्रयत्न केला.” असा आरोप शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षणमंत्री आहे, ज्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. मुले अनवाणी पायांनी शाळेत जात म्हणून त्यांना शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला. शालेय गणवेशाचे टेंडर १३८ कोटी रुपयांचे होते. आधी फक्त मागास वर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी यांना गणवेश दिले जायचे. या टेंडरमध्ये राज्य सरकारचे जवळजवळ ११ कोटी रुपये वाचले आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळ शासनाची संस्था आहे. त्यांना हे काम देण्यात आले. यात वीस हजार महिला गणवेश शिवण्याचे काम करतात. त्यांना याचा अनुभव नव्हता, त्यामुळे कदाचित गणवेश शिवण्याला उशीर झाला असावा, अशी माहिती देत केसरकर यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले. तसेच आदित्य ठाकरे यांनी सर्व पुरावे तपासून बोलायला हवे, असेही ते म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThackeray#deepakkesarkar#MahavikasAghadi#Mahayuti#UddhavThackeray
Previous Post

अजित पवार सकाळी, मी मध्यरात्रीपर्यंत आणि शिंदे…फडणविसांची माहिती!

Next Post

पुण्याच्या पालकमंत्रिपदी ‘दादा’ कोण?

Next Post
पुण्याच्या पालकमंत्रिपदी ‘दादा’ कोण?

पुण्याच्या पालकमंत्रिपदी 'दादा' कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.