DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्याच्या पालकमंत्रिपदी ‘दादा’ कोण?

मोहोळ म्हणाले, तुमच्या यॉर्कर किंवा गुगलीला मी ओळखून आहे.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
पुण्याच्या पालकमंत्रिपदी ‘दादा’ कोण?

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार की चंद्रकांत पाटील यांच्यापैकी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणींपैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सावधपणे यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महायुती सरकारचे खातेवाटप शनिवारी झाले असून आता पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर दावा केलाय. शपथविधी झाल्यावर आठवडाभराने खातेवाटप झालं. आता पालकमंत्री कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील मुख्य जिल्ह्यांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणत्या दादांकडे असणार? अजित पवार की चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. अशातच यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडे या स्तरावरती काही ठरत नाही. आमचे नेते त्याच्यावर निर्णय घेत असतात, पालकमंत्रिबाबत महायुतीचे सगळे नेते बसून फक्त पुण्याचे नाहीतर महाराष्ट्राच्या जिल्ह्याचे निर्णय होतील. तुम्ही कशीही गुगली टाकली तरी मी सावध आहे. यॉर्कर टाका, गुगली टाका मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललो आहे. खातेवाटप एकमताने झाले, आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना एकमताने होतील. याबाबत कोणतीही शंका माझ्या मनात नाही, तुम्हीसुद्धा ठेवू नका, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

बारामती मतदारसंघातून अजित पवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तर चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघामधून विजयी झाले. कोथरूडमध्ये तिरंगी लढत झाली होती, त्यामध्ये चंद्रकांत दादांनी विजय मिळवला होता. खातेवाटपामध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते कायम ठेवण्यात आलंय.

दरम्यान, अजित पवार भाजपसोबत गेले होते त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदासह त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपदही देण्यात आले होते. यंदा पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्यासह रायगड, ठाणे, बीड आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे. बीडमध्ये मुंडे बहिण-भावांमध्ये कोणाला पालकमंत्रिपद मिळणार? बीड जिल्ह्यामध्ये दोन मंत्री असल्याने पंकजा मुंडे की धनंजय मुंडे कोणाच्या पारड्यात पालकमंत्रिपद जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#ChandrakantPatil#Mahayuti#MurlidharMohol#puneguardianministerPune
Previous Post

“आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर दबाव आणला….”

Next Post

टीम इंडियाच्या महिला संघाने बांगलादेशला हरवून घेतला बदला!

Next Post
टीम इंडियाच्या महिला संघाने बांगलादेशला हरवून घेतला बदला!

टीम इंडियाच्या महिला संघाने बांगलादेशला हरवून घेतला बदला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.