DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

टीम इंडियाच्या महिला संघाने बांगलादेशला हरवून घेतला बदला!

पहिल्याच हंगामात महिला अंडर-19 आशिया कप जिंकला.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
टीम इंडियाच्या महिला संघाने बांगलादेशला हरवून घेतला बदला!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

मलेशिया: नुकताच पुरुष अंडर १९ आशिया कप खेळला गेला, ज्याच्या अंतिम फेरीत बांगलादेश संघाने टीम इंडियाचा पराभव केला. आता भारतीय महिला संघाने या पराभवाचा बदला घेतला आहे. महिला अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी २२ डिसेंबर रोजी झाला. मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी भिडले, पण यावेळी टीम इंडियाने ४१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या महिला संघाने ११७ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ७६ धावांवर गडगडला. महिलांसाठी स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती.

अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. मात्र भारतीय संघाच्या फलंदाज विशेष काही करू शकल्या नाहीत. त्रिशाच्या ४७ चेंडूत ५२ धावांच्या खेळीमुळे जी संघाला ११७ धावा करता आल्या. धावा वाचवण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर होती, ती त्यांनी चोख बजावली. छोटी धावसंख्या वाचवताना विजो जोशिताने दुसऱ्याच षटकात पहिले यश मिळवून दिले.

पाचव्या षटकात २४ धावांवर पारुनिका सिसोदियाने दुसरा धक्का दिला त्यानंतर बांगलादेशीने २० धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सोनम यादवने एक विकेट घेत सामन्यातील भारताची पकड मजबूत केली. यानंतर बांगलादेश संघाला सावरता आले नाही आणि पुढील ३२ धावा करण्यासाठी उर्वरित ७ विकेट गमावल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने ९ चेंडू शिल्लक असताना ४१ धावांनी सामना जिंकला.

भारताची सलामीवीर जी त्रिशाला अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्या डावात जेव्हा टीम इंडियाची दमछाक झाली तेव्हा तिने जबाबदारी घेतली. ती एका टोकाला चिकटून राहिली आणि हळूहळू धावसंख्या वाढवत राहिली. इतकंच नाही तर त्रिशाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही निवडण्यात आलं. ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.

 

त्रिशाने ५ डावात १२० च्या स्ट्राईक रेटने आणि ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या. अंतिम सामन्यात आयुषी शुक्लाने ३.३ षटकात १७ धावा देत ३ बळी घेतले आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. तिने ५ सामन्यात १० विकेट घेतल्या. अंतिम फेरीत सोनम यादवने २, पारुनिका सिसोदियाने २ आणि जोशिताने १ बळी घेत तिला साथ दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #bangladesh#teamindia#womensunder19cricketasiacup
Previous Post

पुण्याच्या पालकमंत्रिपदी ‘दादा’ कोण?

Next Post

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

Next Post
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.