DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’!

भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in ताज्या बातम्या, देश-विदेश, राजकीय
0
पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

कुवेत सिटी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान,कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारकअल कबीर’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी कुवेतच्या ‘बायान पॅलेस’ येथे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली आहे.

भारत आणि कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०.४७ अरब अमेरिकी डॉलर इतका होता. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे, जो देशाच्या तीन टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करतो.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KuwaitAward#PMModi#TheorderofMubaraktheGreat
Previous Post

उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांना डंपरने चिरडले!

Next Post

‘त्या’ पुन्हा पालकमंत्री होणार?

Next Post
‘त्या’ पुन्हा पालकमंत्री होणार?

'त्या' पुन्हा पालकमंत्री होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार! ‘इंडिया’ आघाडीचं धक्कातंत्र?

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार! ‘इंडिया’ आघाडीचं धक्कातंत्र?

August 19, 2025
पावसाचा सर्वत्र धुमाकूळ.कोल्हापूरमधील रस्ते बंद!

पावसाचा सर्वत्र धुमाकूळ.कोल्हापूरमधील रस्ते बंद!

August 19, 2025
हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

August 19, 2025
ही तर निवडणूक आयोगाची मग्रुरी – संजय राऊत!

ही तर निवडणूक आयोगाची मग्रुरी – संजय राऊत!

August 19, 2025
ऋता–ललितच्या ‘आरपार’चा टीझर ‘सैयारा’ पेक्षा हिट?

ऋता–ललितच्या ‘आरपार’चा टीझर ‘सैयारा’ पेक्षा हिट?

August 11, 2025
‘बिग बॉस’मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष – १० लाखांचा गंडा!

‘बिग बॉस’मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष – १० लाखांचा गंडा!

August 11, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.