DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘त्या’ पुन्हा पालकमंत्री होणार?

शिवसेनेत तीव्र नाराजी.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
‘त्या’ पुन्हा पालकमंत्री होणार?

रायगड प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

खातेवाटप मार्गी लागताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत चढाओढ सुरु झाली आहे. पालकमंत्री आपल्याकडे घेत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याची संधी महायुतीमधील मित्रपक्षांना हवी आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सातत्यानं चर्चेत राहिलेले, अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंत्रिपदी विराजमान झालेले भरत गोगावले आता पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. रायगडचं पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावं, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मी शपथ घेणार. त्यासाठी कोट तयार आहे, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया महाडचे आमदार भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा दिली. पण त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांसह महायुतीत प्रवेशकर्ते झाले आणि गोगावले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न अडीच वर्षे अधुरंच राहिलं. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे महायुतीत येत मंत्री, पालकमंत्री झाल्या. त्यामुळे गोगावले यांच्या जखमेवर मीठच चोळलं गेलं. आता तटकरे पुन्हा एकदा मंत्री झाल्या आहेत. त्या पुन्हा एकदा पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. त्या पालकमंत्री नकोत, असा गोगावलेंचा सूर आहे.

पालकमंत्री आपल्याच पक्षाकडे राहावं, अशी रायगडमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी बॅनरवॉर सुरु झालं आहे. अदिती तटकरेंचा मोठा फोटो असलेले बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलेले आहेत. त्यावर भावी पालकमंत्री असा उल्लेख आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर फिक्स पालकमंत्री असा उल्लेख असलेले होर्डिंग शिवसेनेकडून लावण्यात आलेले आहेत. त्यावर गोगावलेंचा फोटो आहे. गोगावलेंना मंत्रिमंडळ विस्तारात रोजगार हमी योजना खातं मिळालं आहे. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झालेल्या गोगावलेंना आता पालकमंत्री होण्याची इच्छा आहे.

जिल्ह्यात ज्या सत्ताधारी पक्षाचे सर्वाधिक आमदार, त्याचा पालकमंत्री असं ढोबळ सूत्र आहे. त्या सुत्रानुसार रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेकडे जाऊ शकतं. तसं झाल्यास गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळू शकेल. रायगडमध्ये विधानसभेचे ७ मतदारसंघ येतात. पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड यांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो.

रायगडमध्ये शिवसेना, भाजपचे प्रत्येकी ३ आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या केवळ १ आमदार आहेत. त्याच देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. जिल्ह्यात भाजपनं एकही मंत्रिपद दिलेलं नाही. तर शिवसेनेनं भरत गोगावलेंकडे मंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी सेनेचे गोगावले आणि राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्यात थेट स्पर्धा आहे. त्यात कोण बाजी मारणार, यावरुन जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कोणाचं असणार या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #adititatkare#bharatgogawale#BJP#NCP#Raigad#shivasena
Previous Post

पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’!

Next Post

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

Next Post
पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.