नवी मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० डिसेंबर २०२४
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो A – 320 या पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. याद्वारे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी संपन्न झाली.
हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद व आनंददायी आहे. यामुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच, नवी मुंबई व परिसरातील नागरिकांना हवाई वाहतुकीसाठी एक सोयीचा पर्याय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे.
नवी मुंबईच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहिलेल्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्याचा निर्णय भाजपा- महायुती सरकारने मागील कार्यकाळात घेतला होता. लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या नावाने असलेले नवी मुंबई विमानतळ, परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.