DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न! पुरंदर तालुका हादरला!

सावकारीने त्रस्त लोकांनी संपर्क करावा - शिवतारे

DD News Marathi by DD News Marathi
December 31, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न! पुरंदर तालुका हादरला!

पुणे प्रतिनिधी :
दि. ३० डिसेंबर २०२४

जेजुरी ता. पुरंदर येथे सावकारांच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र पारखे असं या व्यक्तीचं नाव असून सध्या ते जेजुरी येथील एका रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून मागील २४ तासांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.

श्री. पारखे यांनी याबाबत सुसाईड नोट लिहून ती सोशल मीडिया मध्ये व्हायरल केली. आपली मुलगी व अन्य नातेवाईकांना सुद्धा त्यांनी ही चिठ्ठी पाठवली आहे. यात सर्व सावकारांची नावे, कर्जाची रक्कम, त्यांना आत्तापर्यंत दिलेले पैसे आणि त्यांचा मोबाईल नंबरसह पत्ता लिहिलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात पुरंदरच्या माजी आमदारांच्या एका नातेवाईकाचा देखील उल्लेख आहे. सावकारांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. तिप्पट व्याज देऊनही सावकार आपल्याला त्रास देत आहेत म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. सावरकरांच्या क्रुरतेचा हा प्रकार कळताच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पोलिसांना सक्त सूचना करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिंदे व सहाय्यक पोलीस दिपक वाकचौरे निरीक्षक यांना शिवतारे यांनी तत्काळ कल्पना दिली. दरम्यान पोलिसांनी सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरवात केलेली असून रातोरात तीन सावकार पोलिसांनी अटक केले.

मोहन ज्ञानदेव जगताप, संभाजी विश्वासराव जगताप, गुलाब अर्जुन जगताप, अनिकेत जगताप, अक्षय चौखंडे, गिरीश हाडके, आशिष रोकडे, तुषार पवार, अक्षय इनामके , अनिल वीरकर, पंकज निकुडे अशी सावकारांची नावे चिठ्ठीत नमूद केलेली आहेत. यापैकी मोहन जगताप, संभाजी जगताप आणि अक्षय ईनामके यांना पोलिसांनी अटक केलेली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

सावकारीने त्रस्त लोकांनी संपर्क करावा – शिवतारे
झालेला प्रकार अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. तालुक्यातील अन्य कुणाचा अशा पद्धतीने सावकारांकडून छळ सुरू असल्यास थेट माझ्या कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्या रक्षणाची आणि सावकारांच्या बंदोबस्ताची जबाबदारी माझी राहील असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केलेले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #SuicideinPurandar#VijayShivtare
Previous Post

‘संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींचे मृतदेह सापडले?’

Next Post

माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील! – आदित्य ठाकरे.

Next Post
माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील! – आदित्य ठाकरे.

माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील! - आदित्य ठाकरे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.