मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ जानेवारी २०२५
सर्वसामान्य माणसाचा पगार साधारण चाळीस हजार, पन्नास हजार असतो. आय टीमध्ये कामाला असणाऱ्याचा पगार फार तर लाखभर असतो, मात्र यापेक्षाही जास्त पगार कमविणाऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. सध्या अशा एका भारतीय व्यक्तीची चर्चा सुरु आहे जिचा महिन्याचा पगार ऐकून आपण स्तब्ध झाल्याशिवाय राहाणार नाही. एखाद्या व्यक्तीला एवढा पगार कसा असू शकतो असा प्रश्न त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला पडल्याशिवाय राहाणार नाही. सोशल मीडियावर सध्या या व्यक्तीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यानं अनेकांचे लक्षही वेधून घेतले आहे.
आपण अशा एका भारतीय व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचा पगाराचा आकडा तब्बल 1458 कोटी रुपये आहे. दर महिन्याला 1 हजार 458 कोटी रुपये कमविणाऱ्या त्या भारतीय व्यक्तीनं आता अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. जगातला सर्वात मोठा पगारदार हा भारतीय आहे. त्यांचे नाव जगदीप सिंग असे आहे. ही व्यक्ती अॅलन मस्कपेक्षाही जास्त पगार घेणारी आहे. जगदीप हे ‘क्वॉन्टम स्केप’ कंपनीचे संस्थापक आहेत. कंपनीचे सीईओ म्हणून सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा एक दिवसाचा पगार ४८ कोटी रुपये आहे. म्हणजे त्यांचा एक दिवसाचा पगार हा अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे असे म्हटले जाऊ शकते. जगातील अग्रगण्य कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय आहेत. आता जगातील सर्वाधिक पगार घेण्याचा मानही एका भारतीय व्यक्तीला मिळाला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावरुन कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. जगातील सर्वात मोठा पगारदार म्हणून सध्या सिंग यांची चर्चा आहे. वर्षाला 17 हजार 500 कोटींचे पॅकेज त्यांना मिळाले आहे. इलेक्ट्रीक कारच्या बॅटरी संशोधनाचे काम त्यांची कंपनी करते. जगदीप सिंग हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बी टेक झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठमोठी पदं भूषविली आहेत.