DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप!

सर्व षडयंत्र त्यांचे असल्याचे खळबळजनक विधान.

DD News Marathi by DD News Marathi
January 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :

दि. ११ जानेवारी २०२५

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परभणी, बीड, पुणे आणि आता पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरेश धस यांच्यासह मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. यासोबतच काही आरोपही केले. दुसरीकडे सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय.

ओबीसी नेत्यांना सुरेश धस आणि जरांगे पाटील टार्गेट करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचा आहे. आता नुकताच पैठण येथील मोर्चात बोलताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे म्हणाले की, दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर गाठ ही आमच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. सर्व षडयंत्र धनंजय मुंडे यांचे असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

जरांगे पाटील हे पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे हे आरोपीला साथ देत आहेत. आता न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाहीये. धनंजय मुंडे हे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करत आहेत. मात्र, न्याय मिळण्यासाठी लढा देणार असल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले. हेच नाहीतर यासोबतच एक गंभीर आरोप आता जरांगे यांनी केलाय. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जातेय. पोलिसांकडून याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीये. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाकडून पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#dhananjaymunde#manojjarange#santoshDeshmukh#SureshDhas#valmikkarad
Previous Post

आमदार सुरेश धस यांचे मुन्नीबद्दल परत मोठे विधान!

Next Post

मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

Next Post
मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.