DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

काय असावं धगधगणाऱ्या आगीचं नेमकं कारण?

DD News Marathi by DD News Marathi
January 13, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश
0
अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

A U.S flag flies as fire engulfs a structure while the Palisades Fire burns during a windstorm on the west side of Los Angeles, California, U.S. January 7, 2025. REUTERS/Ringo Chiu

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ११ जानेवारी २०२५

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये वणव्यामुळे भयानक आग पसरली आहे. यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २४ वर पोहोचली आहे. लॉस एंजेलिस काऊंटीच्या मेडिकल एक्झामिनरनी या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये 14 हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे. या दरम्यान, लवकरच पदावरुन पायउतार होणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अशी घोषणा केली आहे की, सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पुढील सहा महिन्यांकरिता ‘जीवन आणि मालमत्तेचं संरक्षण’ करण्यासाठीचा सर्व खर्च उचलेल. लॉस एंजेलिस काऊंटीचे मेडिकल एक्झामिनर यांनी सांगितलं आहे की, या आगीमुळे मृत्यू झालेल्यांची सध्या ओळख पटवली जात आहे.

त्यांनी एक निवेदन प्रसारित केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, “मृतांची ओळख पटवण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. कारण, सध्या तरी भीषण आगीमुळे तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एक्झामिनर पोहचण्यास असमर्थ आहेत.” सोबतच, मृतांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. याआधी पॅलिसेड्समध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ईटनमध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेली आग भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढतच चाललं आहे. आतापर्यंत कमीत कमी सहा जंगले या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरुन लवकरच पायउतार होणार्‍या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता.

आगीचे तीव्र लोट आता अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिसमधील जवळपास सर्व परिसरामध्ये पसरले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाखांहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बर्‍याच अडचणी येत आहेत. बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे. या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची ऑस्कर नामांकनांची घोषणादेखील दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहेत. यापूर्वी ही घोषणा 17 जानेवारी रोजी होणार होती, परंतु आता 19 जानेवारी रोजी अकादमी पुरस्कार नामांकनांबाबतची माहिती दिली जाईल. जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर उत्तर-पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये येतो. मात्र, फक्त 10 एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली. आता शहरभर आकाशात धुराचे लोट जमा झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असूनही सद्यस्थितीत ही आग 14 हजार एकरमध्ये पसरलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वांत विनाशकारी आग मानली जात आहे. लॉस एंजेलिस फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की, या भीषण आगीमुळे इथे राहणारा जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #America#Fire#FireinJungle#LosAngeles
Previous Post

सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

Next Post

वाहतूक पोलिसाला मद्यधुंद तरुणाकडून मारहाण!

Next Post
वाहतूक पोलिसाला मद्यधुंद तरुणाकडून मारहाण!

वाहतूक पोलिसाला मद्यधुंद तरुणाकडून मारहाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.