DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

खो खो विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला मिळाला नाही एकही रुपया!

खेळाडू रिकाम्या हातानेच माघारी.

DD News Marathi by DD News Marathi
January 21, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
खो खो विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला मिळाला नाही एकही रुपया!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२५

पहिला खो-खो विश्वचषक भारतासाठी खूप खास होता. खो खो विश्वचषकाच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला. पण, या ऐतिहासिक कामगिरीनंतरही कोणत्याही संघाला बक्षीस रक्कम मिळाली नाही.

पहिला खो-खो विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांकडून दमदार कामगिरी दिसून आली. दोन्ही प्रकारांमध्ये भारत पहिला विश्वविजेता ठरला. भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून जेतेपद पटकावले. त्याच वेळी, पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचा अंतिम सामनादेखील भारत आणि नेपाळ यांच्या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातही भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक कामगिरीनंतरही दोन्ही भारतीय संघांना बक्षीस रक्कम देण्यात आली नाही.

खो-खो विश्वचषकाच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला आणि विजेतेपद पटकावले. पण दोन्ही संघांच्या बॅगा रिकाम्याच राहिल्या. विश्वविजेत्या ठरलेल्या भारतीय संघांना फक्त ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना पदके देण्यात आली. त्याच वेळी, खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार देखील देण्यात आले. पण कोणत्याही संघाला बक्षीस रक्कम मिळाली नाही. खरं तर, खो खो विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, विजेत्या संघाला रोख बक्षीस दिले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. या कारणास्तव भारतीय संघाला बक्षीस रक्कम देण्यात आली नाही.

भारतीय महिला संघाने एकतर्फी पद्धतीने अंतिम जिंकला सामना!
भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा ३८ गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात भारताने ७८ गुण मिळवले. त्याच वेळी, नेपाळ महिला संघ ४० गुण मिळवू शकला. या सामन्यात भारतीय महिलांनी पहिल्या वळणापासूनच वर्चस्व राखले आणि नेपाळ संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पहिल्या फेरीतच, भारतीय संघाने ३४-० अशी मोठी आघाडी घेतली जी शेवटपर्यंत कायम राहिली.

अंतिम सामन्यात नेपाळचा ५४-३६ असा पराभव भारतीय पुरुष संघाने केला!
भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा ५४-३६ असा पराभव केला. पुरूषांच्या खो-खो विश्वचषकात एकूण २० संघांनी भाग घेतला. यावेळी, भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतानसह गट अ मध्ये होता. तो प्रत्येक सामना जिंकण्यात यशस्वी झाला. नॉकआउट सामन्यांमध्येही टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला आणि ते चॅम्पियन बनले. स्पर्धेचा पहिला सामनाही जेव्हा या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आला, तेव्हाही टीम इंडिया जिंकली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #IndiaWins#IndiraGandhiStadium#Kho_Kho_Worldcup
Previous Post

शिक्षकांचे अश्लील कृत्य सीसीटीव्ही मध्ये कैद!

Next Post

‘महाकुंभ’ मेळ्यातील ‘मोनालिसा’ ला थेट चित्रपटाची ऑफर!

Next Post
‘महाकुंभ’ मेळ्यातील ‘मोनालिसा’ ला थेट चित्रपटाची ऑफर!

'महाकुंभ' मेळ्यातील 'मोनालिसा' ला थेट चित्रपटाची ऑफर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेलुरा गावातील रस्त्याचे काम व पुलाचे बांधकाम रखडले!

बेलुरा गावातील रस्त्याचे काम व पुलाचे बांधकाम रखडले!

May 12, 2025
अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कौठा बस स्थानकात चिखल. 

अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कौठा बस स्थानकात चिखल. 

May 12, 2025
रतनपूर शेत शिवारातील तीन एकर संत्रा बागेवर चालविली कुर्‍हाड.

रतनपूर शेत शिवारातील तीन एकर संत्रा बागेवर चालविली कुर्‍हाड.

May 12, 2025
शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

May 12, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

May 12, 2025
मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

May 12, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.