बीड प्रतिनिधी :
दि. २२ जानेवारी २०२५
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे उजेडात आलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड! त्याच्या संपत्तीचा छडा विविध माध्यमांच्या साहाय्याने नुकताच लागला आहे. त्याची ही प्रचंड प्रचंड संपत्ती भल्याभल्यांची झोप उडवल्याशिवाय राहाणार नाही.
उसतोड कामगारांच्या जिल्ह्यातला एकेकाळचा घरगडी वाल्मिक कराडची आजची संपत्ती-
-मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे ७५ कोटींचा फ्लोअर
-पुण्यातल्या FC रोडवर ७ शॉप, प्रत्येकी ५ कोटी किंमत
-बीड जिल्ह्यात ३५ कोटींचे ७ वाईन शॉप
-दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर बार्शीत ५० एकर
-ज्योती जाधवच्या नावावर सोलापूरात ४ सातबारे
-ज्योती जाधवच्या नावे जामखेडमध्ये १०-१५ एकर
-माजलगावात सुदाम नरवडेच्या नावावर ५० एकर
-सिमरी पारगावात मनिषा नरवडेच्या नावावर १०-१२ एकर
-सिमरी पारगावात योगेश काकडेच्या नावावर १५-२० एकर
-सोनपेठ तालुक्यात २० एकर क्रशर
-दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर १०-१५ एकर
-पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत ३.२५ कोटींचा ४BHK फ्लॅट
-आयटी हब वाकडमध्ये १ कोटींचा २ BHK फ्लॅट
-ज्योती जाधवच्या नावाने पुण्यात १५ कोटींचे २ ऑफिस
-पुण्यात हडपसरच्या एमनोरामध्ये ३ कोटींचे २ फ्लॅट
-ज्योती जाधवच्या नावाने खराडीत २ कोटींचा एक फ्लॅट
– धनंजय मुंडेंसोबत पार्टनरशिपमध्ये कंपनी, जागा
वेगवेगळे मीडिया रिपोर्ट, सुरेश धस, अंजली दमानिया यांच्या संदर्भाने ही आकडेवारी काढलीये.
काही वर्षांपुर्वी घरगडी असलेला कराड इतकी मालमत्ता जमवतो कशी… उसतोडीसाठी जिथले मजूर पोटावर संसार बांधत देशभरात जातात त्याच परळीत वाल्मिक कराड इतकी माया जमवतो कशी.?
ना यशस्वी उद्योजक, ना कुशल शेतकरी, ना वडिलोपार्जित संपत्ती, ना शेअर मार्केटमधला तज्ज्ञ, ना मोठी दुकानं… मग इतके कोटी कमावले कसे? इतकी संपत्ती आली कुठुन? इतकी गुन्हेगारी, कायद्याला हरताळ फासून सुद्धा पोलिस, इडी कोणाच्याही रडारवर कराड आला कसा नाही?
नेत्यांच्या अनौरस कामांवर जगणारे दलाल हे प्रत्येक तालुका, जिल्ह्यात असतात. फरक फक्त इतकाच आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरमामुळे कराड पकडला गेला. मग हे सगळं समोर आलं. पण असे अनेक कराड आहेत ज्यांची माया, काळी दुष्कृत्य अजूनही जगासमोर यायची आहे….. असे किती जण महाराष्ट्रात असतील?
याच बीडमधून वंजारी समाजाचे संघर्ष करुन प्रशासकीय अधिकारी झालेले तुकाराम मुंढे आहेत.. जे मेहनतीच्या जोरावर आएएस झाले. प्रामाणिकपणे काम करुन कारकिर्द गाजवतायत. याचा बदला म्हणून त्यांच्या वाट्याला फक्त बदल्या येतात तरीही प्रामाणिकपणाची कास त्यांनी सोडली नाही. दुसरीकडे त्याच समाजातला वाल्मिक कराड आहे…