पुणे प्रतिनिधी :
दि. २२ जानेवारी २०२५
प्रथम पश्चिम बंगाल, नंतर विविध ठिकाणी राहून गेल्या २००४ पासून तो महिर्षीनगरमध्ये गारमेंटचा व्यवसाय करुन राहत होता. अगदी जन्म दाखल्यापासून सर्व कागदपत्रे तो भारतीय असल्याचे दाखवून देत होता. त्याच्याकडून 7 आधार कार्ड, 7 पॅनकार्ड, 4 पासपोर्ट; पाकिस्तानी चलनी नोटा, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशियाचे चलन जप्त करण्यात आले आहे.
आयएमओ सारखे आंतरराष्ट्रीय फ्री व्हिडिओ कॉल करण्याचे अॅप मिळून आले. तेव्हा त्याने कबुली दिली. पतित पावन, क्रांतीवीर सेना, सकल हिंदु समाज अशा विविध संघटनांनी सुरु केलेल्या बांगला देशी हटाव मोहिमेचे सर्व प्रथम वृत्त ‘पोलीसनामा’ ने प्रसिद्ध केले होते. अखेर पोलिसांनी या बांगलादेशीला अटक केली आहे.
स्वारगेट पोलिसांनी एहसान हाफिज शेख (वय ३४, रा. झांबरे पॅलेस, महर्षीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यात मिळालेल्या वस्तू पाहून पोलिसही चक्रावून गेले.
त्याच्या घरात कोलकाता येथे काढलेला बनावट जन्म दाखला, वेगवेगळ्या नावाने काढलेले ७ आधार कार्ड, अहसान हाफिज शेख नावाने काढलेले वाहनचालक परवाना, याच नावाचे २ पॅनकार्ड, खैरुल माजिद शेख या नावाने एक पॅन कार्ड, वेगवेगळ्या नावाची एकूण ७ पॅनकार्ड, एकूण ४ पासपोर्ट, आयसीआयसीआय बँकचे इंटरनॅशनल डेबिट कार्ड, शॉप अॅक्ट लायसेन्स, जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि सर्वावर कडी म्हणजे ८ जन्माचे दाखले, वेगवेगळ्या नावाने ग्रामपंचायतींनी दिलेले दाखले़ याशिवाय पाकिस्तानी, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, युएई, *मलेशिया या देशांच्या चलनी नोटा त्याच्याकडे आढळून आल्या आहेत.
याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल नाईक, आप्पा क्षीरसागर व युवराज शेलार व इतरांना महर्षीनगर येथे राहणार्या एकाला पोलीस ठाण्यात हजर करुन तो बांगला देशी असल्याचा संशय व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी त्याच्याकडे चौकशी करुन त्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. एहसान शेख याने आपण २०१६ पासून महर्षीनगर येथे रहात असून गारमेंटचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी त्याने अनेक पुरावे आणून पोलिसांना दाखविले. त्यात आधार कार्ड, भाडे करार, मतदान ओळख पत्र दाखविले. पोलिसांनी त्याला आईवडिलांचे पुरावे, जन्म दाखला मागितला़ भारतीय असल्याची अधिकृत कागदपत्रे सादर करु शकला नाही. शेवटी दहशतवाद विरोधी पथकाने त्याचा मोबाईल पाहिला. तेव्हा त्यात पोलिसांना पुरावा आढळून आला. त्यात अनेक बांगलादेशी नागरिकांचे फोन नंबर सेव्ह केले होते. त्यात कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे त्याचे जन्म प्रमाणपत्र मिळाले. त्यावरील पालकांचा पत्ता ही पश्चिम बंगालमधील होता.
त्याचवेळी बांगला देशातील कॉलिंग केलेले फोन नंबर खुप होते. ते पाहिल्यावर त्याने आपण मूळचे बांगला देशी असून २००४ मध्ये बांगला देशावरुन एजंट उज्जलला ४० हजार रुपये देऊन मार्फत कोलकाता येथे आलो. तेथील हॉस्पिटलमधून बनावट जन्म प्रमाणपत्र तयार केले. तेथून अहमदाबाद नंतर मुंबई करत २००९ मध्ये पुण्यातील भोसरी येथे काही महिने राहिलो. कात्रज येथे २ वर्षे राहिलो. २०१२ पासून महर्षीनगर येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बनावट कागदपत्रे, सर्टिफिकेट बनविण्यात आता तो तज्ञ झाल्याने इतरांना तो अशीच बनावट कागदपत्रे बनवून देत होता. त्यामुळे त्याच्याकडे सापडलेले पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे इतर लोकांचे आहेत की त्याचेच आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना यांच्यासह सकल हिंदू समाज यांचे सर्वजण अभिनंदन करीत आहेत!