DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

परळीतील महादेव मुंडेंचा खुनी कोण?

वाल्मिक कराडच्या मुलाचा काय आहे संबंध?

DD News Marathi by DD News Marathi
January 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
परळीतील महादेव मुंडेंचा खुनी कोण?

बीड प्रतिनिधी :
दि. २४ जानेवारी २०२५

परळीतील पिग्मी एजंट असलेल्या महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जात आहे. परळीमध्ये भर तहसीलच्या समोर संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान एक खून झाला होता. या घटनेला पंधरा महिने उलटलेत तरीही खुनाचा उलगडा झालेला नाही. यादरम्यान चार तपास अधिकारी बदलले, दोन एसपींची बदली झाली. आपल्या पतीला न्याय मिळवा म्हूणन पत्नीने पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवले. पण आरोपी मिळाले नाहीत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया.

महादेव दत्तात्रेय मुंडे या पिग्मी एजंट, दूध व्यवसायिकाचा २१ ऑक्टोबर २०२३ च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर हातावर धारदार शस्त्राने वार करून हत्या होते. या घटनेला आज दीड वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही महादेव यांचा खून कोणी केला आणि का केला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात या सगळ्या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला. पण आरोपी कोण हे काही निष्पन्न होत नव्हते. दोन अडीच महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले, मेहुणा सतीश फड यांनी तत्कालीन एसपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक , पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले. मात्र न्याय मिळाला नाही.

सुरेश धसांनी प्रकरण उजेडात आणलं
पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेंच्या खुनाचे आरोपी फिरत असल्याचा दावा केला. सुरेश धसांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं. याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची विनंती केली.

पोलिसांनी आरोपींचा तपास केलाच नाही
यातील धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील सायबर तज्ज्ञांनी या सगळ्या प्रकरणात डाटा वेगळा करून 150 मोबाईल काढले, त्यातून सहा मोबाईल क्रमांक काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला. शिवाय तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाईल डाटा तपासण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप
त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला आहे. याबरोबरच जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटरसायकल, मयताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल मारेकर्‍याचा काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला, तर मग तिथून बाजूलाच असलेला मयत महादेव मुंडेचा मृत्यू पोलिसांना का दिसला नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “निदान आता तरी नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे महादेव मुंडे यांच्या खुन्याला जेर बंद करतील हीच अपेक्षा”, असे ते म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#MahadevMunde#parali#sushilKarad#valmikkarad
Previous Post

अजितदादा म्हणाले, बायकोने पण एवढे किस कधी घेतले नाहीत!

Next Post

आमदार सुरेश धस यांच्यावर एका पीडित युवतीचा गंभीर आरोप!

Next Post
आमदार सुरेश धस यांच्यावर एका पीडित युवतीचा गंभीर आरोप!

आमदार सुरेश धस यांच्यावर एका पीडित युवतीचा गंभीर आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.