DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

ChatGPT आणि Gemini चे धाबे दणाणले.

DD News Marathi by DD News Marathi
January 29, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश
0
चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२५

चीनच्या DeepSeek R1 ची एकच चर्चा सुरू आहे. यामुळे ChatGPT आणि Gemini पुढे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. अवघ्या दोनच महिन्यात या नवीन मॉडलने बाजारात नवीन ओळख निर्माण केली आहे.
OpenAI ने ChatGPT 2 वर्षांपूर्वी लाँच केले होते. जेव्हा OpenAI चॅटबॉटने बाजारात पाऊल ठेवले, तेव्हा जगभरातील तंत्रज्ञान जुने वाटत होते. त्याचवेळी चीन हा या नवप्रगत तंत्रज्ञानात पिछाडीवर असल्याचे समोर आले होते. तेव्हाच गुगलने पण जेमिनी, मेटा आणि ॲमेझॉनवर AI चॅटबॉट्स आणले. चीन त्यानंतर खडबडून जागा झाला. चीनने Alibaba आणि Baidu प्लेटफॉर्मवर अब्जावधी रूपये खर्च केल्यानंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानचा बॅकलॉग भरून काढला. त्याने एक दमदार मॉडल समोर आणले आहे. DeepSeek एक स्टार्टअप आहे जे ChatGPT आणि दुसर्‍या AI मॉडेल पेक्षा वेगळे आहे.

DeepSeek R1 ची ही आहे खासियत!

DeepSeek R1 हे एआय मॉडेल चीनचे स्टार्टअप DeepSeek ने तयार केले आहे. तर एक महिन्यापूर्वीच डीपसीक R1 लाँच करण्यात आले आहे. हे रिझनिंग मॉडल मार्केटमध्ये अत्यंत व्हायरल झाले आहे. अत्यंत कमी किंमतीत दमदार कामगिरी करणारे हे तंत्रज्ञान आणण्यात आले आहे. DeepSeek R1 हे ऑगमेंटेड रिजनिंग आणि ॲनालिटिक्ल कॅपेबिलिटीसाठी तयार करण्यात आले आहे. DeepSeek R1 हे एक अॅडव्हांस लँग्वेज मॉडेल आहे. हे V3 प्रमाणे एक हायब्रिड आर्किटेक्चरवर तयार करण्यात आले आहे.

DeepSeek कंपनीचे मुख्य कार्यालय हे चीनमधील हांग्जो या शहरात आहे. आता ही कंपनी कोणी आणि केव्हा सुरू केली याची उत्सुकता आहे. या कंपनीची सुरूवात 2023 मध्ये Liang Wenfeng यांनी केली होती. या कंपनीचे उद्दिष्ट AGI (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) विकसीत करणे आहे. डीपसीक अल्पावधीतच लोकप्रिय होण्यामागे त्याची कमी किंमत हे मुख्य कारण आहे. DeepSeek R1 ची किंमत 0.55 डॉलर (जवळपास 47 रुपये) प्रति दशलक्ष इनपूट टोकन आणि 2.19 डॉलर (जवळपास 189 रुपये) प्रति दशलक्ष आउटपुट टोकन इतकी आहे.

केवळ दोन महिन्यात विकसित केले आहे हे नवीन तंत्रज्ञान!

डीपसीक कंपनीनुसार हे AI मॉडेल केवळ दोन महिन्यात तयार करण्यात आले आहे. तर OpenAI, Microsoft आणि Google यांना AI मॉडेल तयार करण्यासाठी वर्ष लागले. त्यासाठी मोठा खर्च आला. अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले. पण DeepSeek ने हे AI मॉडेल तयार करण्यासाठी केवळ 60 लाख डॉलर इतकीच गुंतवणूक केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AI#ChatGPT#China#DeepSeek#Gemini#Google
Previous Post

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!

Next Post

पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

Next Post
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.