DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या!

आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिल्या चिठ्ठ्या

DD News Marathi by DD News Marathi
February 6, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
दि. ०६ फेब्रुवारी २०२५

श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.

पहिली चिठ्ठी मित्रांसाठी
‘प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि सर्व मित्रांनो,

मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय, हे मला ठाऊक आहे, पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो – माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. माझ्या बहिणीला चांगले स्थळ पाहा आणि तिचे लग्न लावा. माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे – मुंबई सिंगवी १७ लाख, बचत गट ४ लाख, सोने तारण २.२५ लाख, गाडी ७ लाख आणि किरकोळ ८० हजार रुपये. गाडी विकून काही फिटेल, पण उरलेलं कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा. मला ठाऊक आहे, मी हे सहज करू शकलो असतो, पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा’

दुसरी चिठ्ठी कुटुंबासाठी
‘प्रिय बाळा आणि संपूर्ण कुटुंब, तुम्ही लढत राहा, हार मानू नका. आयुष्य थांबवू नका. मी संपलोय, पण तुम्ही अजून खूप मोठं होणार आहात. मी हतबल झालोय, म्हणून पूर्णविराम देतोय. स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याला पुढे न्या.’

तिसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीसाठी
शिरीष महाराज मोरे यांचा विवाह नुकताच ठरला होता. टिळाही झाला होता. २० एप्रिल रोजी त्यांचा विवाह होता. त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे. ‘आपली कहाणी आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुला असं सोडून चाललोय. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत होतीस, माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत उभी राहिलीस. पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही. मी तुझी स्वप्नं तोडतोय, याची मला जाणीव आहे. तुला एका चांगल्या मुलासोबत सुखी पाहायचं होतं, पण मी तुला फक्त दुःख दिलं. कृपा करून पुढे जा, आयुष्य सुंदर कर. खूप मोठी हो’.

चौथी चिठ्ठी आई-वडिलांसाठी
‘प्रिय मम्मी-पप्पा, दीदी, वयाच्या ३० व्या वर्षी जे काही मिळवायचे होते ते तुमच्या पाठिंब्यामुळे सहज मिळाले. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, पण मीच आता सोडून चाललोय. कधी कधी सर्व मिळवूनही माणूस हरतोच. मी हरलो… मी थांबतोय. याचा संपूर्ण दोष माझा आहे. तुम्हाला एकटं टाकून जातोय. मला माफ करा… तुमचाच पप्प्या’.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #PimpriChinchwad#shirishmaharajmore#Suicide
Previous Post

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा मोठा धक्का, घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी!

Next Post

पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरी २०२५ चा थरार?

Next Post
पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरी २०२५ चा थरार?

पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरी २०२५ चा थरार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.