नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०८ फेब्रुवारी २०२५
दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. सध्याच्या हाती आलेल्या कलांनुसार भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. लागणार आहे. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यंदातरी भाजपचा २७ वर्षांचा वनवास संपेल की नाही हा प्रश्न होता. मात्र, भाजपने या निवडणुकीत अत्यंत आश्चर्यकारकपणे मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झालेला दिसत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. त्याबरोबरच मनीष सिसोदिया, आतीशी मारलेना आणि सत्येंद्र जाईनही पिछाडीवर असल्याचे समजते. सध्याच्या निकालांनुसार, भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आपकडे फक्त २२ जागा आल्या आहेत. ‘मोदी लहर’ इथे दिसणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते पण त्याविरुद्ध निकाल लागला आहे. दिल्लीत ‘आप चा सुपडा साफ’ झाल्याचे दिसून येत आहे.