DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रतन टाटांनी यांना दिली 500 कोटींची संपत्ती!

कोण आहेत मोहिनी दत्ता?

DD News Marathi by DD News Marathi
February 8, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
रतन टाटांनी यांना दिली 500 कोटींची संपत्ती!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ फेब्रुवारी २०२५

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीमधील जवळपास एक तृतीयांश हिस्सा एका अशा व्यक्तीला मिळणार आहे ज्याबाबत फारशी कुणाला माहिती नाही. रतन टाटांचं 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूपत्राची माहिती समोर आली आहे. त्यानुसार रतन टाटा यांनी जवळपास 500 कोटींची संपत्ती मोहिनी मोहन दत्ता (Mohini Mohan Dutta) यांच्या नावावर केली आहे. त्यानंतर मोहिनी दत्ता कोण आहेत? ही चर्चा सुरु झाली आहे.

रतन टाटांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव आहे. टाटांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. प्रोबेटचा कालावधी संपल्यानंतर आणि हायकोर्टानं प्रमाणित केल्यानंतरच त्यांना ही संपत्ती मिळणार आहे. त्यासाठी किमान सहा महिने कालावधी लागू शकतो.

मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूरचे उद्योजक आहे. ते स्टॅलियन कंपनीचे सहमालक आहेत. त्यानंतर ते टाटा सर्व्हिसेसचा भाग बनले. विलिनीकरणाच्या पूर्वी त्यांच्याकडं स्टॅलियनचे 80 टक्के समभाग होते. तर टाटा इंडस्ट्रीकडून 20 टक्के समभाग होते. आपली रतन टाटांची पहिली भेट जमेशदपूरमधील डिलर्स हॉस्पिटलमध्ये झाली होती, त्यावेळी मी फक्त 24 वर्षांचा होतो, अशी माहिती मोहिनी दत्ता यांनी दिली आहे.

टाटा समुहाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण टाटा कुटुंबीयांचे जवळचे आहोत, असं दत्त नेहमी सांगत. रतन टाटांनी आपल्याला मदत केली आणि त्यांना प्रशिक्षित केलं, असं दत्ता यांनी काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.

मोहिनी मोहन दत्ता आणि टाटा समूहाचे नाते तब्बल 6 दशकांपासून आहे, असं सांगितलं जातं. डिसेंबर 2024 मध्ये मुंबईतील एनसीपीएमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रतन टाटा यांच्या जयंती कार्यक्रमासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, अशी कथित माहिती आहे. त्या कार्यक्रमात फक्त टाटा यांचे कुटुंबीय आणि जवळचे व्यक्ती सहभागी झाले होते.

फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार मोहिनी मोहन दत्ता यांची मुलगी टाटा ग्रुपमध्ये कार्यरत होती. त्या 2015 पर्यंत ताज हॉटेलमध्ये तर 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करत होत्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MohiniDutta#RatanTata#TataGroup#WillofRatanTata
Previous Post

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी व्यक्ती पराभूत!

Next Post

अमित ठाकरेंना मिळाली विधानपरिषदेची ऑफर?

Next Post
अमित ठाकरेंना मिळाली विधानपरिषदेची ऑफर?

अमित ठाकरेंना मिळाली विधानपरिषदेची ऑफर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.