DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अमित ठाकरेंना मिळाली विधानपरिषदेची ऑफर?

फडणवीसांच्या शिवतीर्थ भेटीचं 'राज' हेच होतं?

DD News Marathi by DD News Marathi
February 10, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अमित ठाकरेंना मिळाली विधानपरिषदेची ऑफर?

मुंबई प्रतिनिधी :

दि. १० फेब्रुवारी २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आले होते. यावेळी भाजपकडून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भाजपच्या कोट्यातून ‘राज’पुत्राला विधिमंडळात पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या गाडीपर्यंत हजर होते

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून अमित ठाकरेंना आमदार करण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून १२ पैकी ७ आमदार नियुक्त झाले आहेत, मात्र पाचपैकी काही जागा भाजपकडे आहेत. त्यातून अमित ठाकरेंची वर्णी लागू शकते.

दरम्यान, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची मदत घेण्याची भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप मनसेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातून महायुती म्हणून पाठिंबा देण्याचीही भाजपची तयारी होती. परंतु शिवसेनेमुळे तो प्लॅन फसला आणि अमित ठाकरेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर आता अमित ठाकरेंना परिषदेवर पाठवून त्या बदल्यात पालिका निवडणुकीत भाजप मनसेची मदत घेण्याची शक्यता आहे.

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. भाजप आणि मनसे यांच्या विचारधारा सारख्या असल्या, तरी निवडणुकांच्या निमित्ताने दोघांमधील जवळीक कमी होताना आणि वाढताना दिसते. लोकसभा निवडणुकांच्या वेळी मनसेने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. तर विधानसभेला राज ठाकरे स्वबळावर सामोरे गेले.

नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. अजित पवारांचे मोठ्या संख्येने आमदार निवडून येण्यावर त्यांनी शंकाही उपस्थित केली. त्याचप्रमाणे भाजपवरही त्यांनी निशाणा साधल्यामुळे त्यानंतर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmitThackeray#DevendraFadnavis#RajThackeray
Previous Post

रतन टाटांनी यांना दिली 500 कोटींची संपत्ती!

Next Post

बळीराजा आणि बैलाचं अनोखं नातं!

Next Post
बळीराजा आणि बैलाचं अनोखं नातं!

बळीराजा आणि बैलाचं अनोखं नातं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.