मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ फेब्रुवारी २०२५
विकी कौशल याच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या चर्चा आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होतोय .छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा काही दिवसांपूर्वी वादात अडकला होता. पण निर्मात्यांनी सावध निर्णय घेत या वादावर पडदा टाकला. आता या सिनेमातल्या काही भागांवर सेन्सॉर बोर्डानंही कात्री लावली आहे. तीन कट्स आणि सात बदल सुचवल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला यूए सर्टिफिकेट दिलंय. तसंच सिनेमाच्या सुरुवातीलाच काही गोष्टी सांगण्यात येणार आहेत.
छावा सिनेमा हा शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे, असं ऑडिओ टेक्स्ट डिस्क्लेमरही देण्यात येणार आहे. तर सिनेमाचा उद्देश इतिहासाशी छेडछाड करण्याचा, कोणाचाही अपमान करण्याचा, चुकीची माहिती देण्याचा नाहीये, असं डिस्क्लेमर देण्यात येणार आहे.
सिनेमाचा उद्देश हा छत्रपती संभाजी महारांना श्रद्धांजली वाहण्याचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता, त्याचं शौर्य, त्यांचं योगदान..हे सगळं जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोवण्याचा उद्देश असल्याचंही निर्मात्यांनी म्हटलंय.