DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्याचा किसिंग सीन चर्चेत!

झी मराठी वाहिनीवरील 'लाखात एक आमचा दादा' ह्या मालिकेचा बहुचर्चित प्रोमो!

DD News Marathi by DD News Marathi
February 12, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्याचा किसिंग सीन चर्चेत!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आहे. त्यामुळे प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेची कथा पाच भावंडांची असून मालिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. डॅडींनी सूर्याच्या आईची बदनामी केली अन् तिला जेलमध्ये अडकवलं. पण हे सत्य सूर्यासमोर येऊ न देण्याचं ठरवलं आहे. अशातच आता व्हॅलेंटाईन वीकनिमित्त या मालिकेत रोमँटिक एपिसोड पाहायला मिळणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमधील या मालिकेचा किसिंग सीन चर्चेत आलाय.

झी मराठीने शेअर केलेल्या, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला, तुळजा सूर्याला शोधत घरी येते तेव्हा तिला संपूर्ण घर सजवलेलं दिसतं आणि केक ठेवलेला असतो. हे सरप्राईज पाहून तुळजा भलतीच खुश होते. त्यानंतर सूर्या आणि तुळजा एकत्र केक कापतात. तुळजा सूर्याला म्हणते की, ‘हे तुझं कसलं सरप्राईज आहे? इथे माझा जीव गेला असता.’ त्यावर सूर्या म्हणतो, ‘माझ्यावर एवढा जीव आहे?’ पुढे तुळजा म्हणते, ‘हो, तू माझा जीव आहेस.’ त्यानंतर दोघं डान्स करतात तेव्हा तुळजा ओठांमध्ये गुलाब ठेऊन सूर्याला किस करते.

मालिकेचा हा सीन आणि प्रोमो पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आजपर्यंत मराठी मालिकांमध्ये इतका इंटिमेट आणि किसिंग सीन दाखवण्यात आला नव्हता. हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून मालिकेचा हा एपिसोड पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नेटकऱ्यांनी मालिकेच्या प्रोमोवर ‘हार्ट’ कमेंट करत ‘आवडती मालिका’ अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

या मालिकेत नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांच्या मुख्य भूमिका असून गिरीश ओक, अतुल कुडले, सुमेधा दातार, कल्याणी चौधरी, कोमल मोरे, समृद्धी साळवी, जुई तनपुरे, ईशा संजय या कलाकारांच्यासुद्धा मुख्य भूमिका आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Kiss#KissingScene#LakhatEkAamachaDada#ZeeMarathi
Previous Post

‘आमीन’? नाही, त्याच्या जागी’जय भवानी’…!

Next Post

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन!

Next Post
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन!

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.