नगर प्रतिनिधी :
दि. १३ फेब्रुवारी २०२४
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नगरसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. शिंदे फडणवीस सरकार असताना अण्णा हजारे यांनी साधी कूसही बदलली नव्हती, असं संजय राऊत म्हणाले होते. या टीकेला अण्णा हजारे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. केजरीवाल आणि सिसोदियांनी भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला तोंड फोंडलं, अण्णा हजारे त्याचे प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचं सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देवाने सांगायला लागत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
“ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं?” असं म्हणत अण्णांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्याआधी विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका केली होती.
यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून पत्रकारांनी सवाल केला म्हणून मी उत्तर दिलं. सगळ्यांनी त्याची प्रशंसा केली. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या. आपण कशाला त्यावर बोलायचे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली.