DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रणवीर अलाहाबादियाची याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली!

सर्व स्तरांतून तीव्र संतापही व्यक्त होतो आहे.

DD News Marathi by DD News Marathi
February 14, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
रणवीर अलाहाबादियाची याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ फेब्रुवारी २०२५

अत्यंत अश्लील वक्तव्य केल्या प्रकरणी चर्चेत असलेला रणवीर अलाहाबादिया यानं आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याता निर्णय घेतलाय.अलाहाबादिया याने समय रैना याच्या कॉमेडी शोमध्ये आईवडील या विषयावर अत्यंत अश्लाघ्य टिप्पणी केली होती. प्रकरण अंगाशी आल्यावर त्यानं माफी देखील मागितली. तरी यावरून त्याच्याभोवती फास आवळला जात आहे.

रणवीर तसंच शोमधल्या इतर सेलिब्रिटींवर मुंबई पाठोपाठ आसाम,गुजरातसह इतर राज्यांतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कडक नोटीस पाठवल्यावर, यूट्यूबनं अलाहाबादिया याच्या आक्षेपार्ह टिप्पणीचा व्हिडीओ काढून टाकण्यात आल्याचं केंद्र सरकारला कळविलं आहे. पण आता रणवीर अलाहाबादिया यानं अनेक राज्यांत दाखल झालेल्या तक्रारींविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, अशी याचिका रणवीरनं सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. मात्र रणवीर अलाहाबादियाच्या या प्रकरणावर तत्काळ सुनावणीची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळं देशभरातून टीका होत असलेल्या या प्रकणावर सुप्रिम कोर्ट काय म्हणणार याकडं आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) सदस्य प्रियांक कानुंगो यांनीही हा व्हिडीओ सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्याच्या ‘पॉडकास्ट’वर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. संसदीय समितीनं हा विषय हाती घेतल्यानं त्याचे गांभीर्य वाढलं आणि तत्काळ कारवाई झाली.

स्टॅंडअप कॉमोडी करणारा कलाकार समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो अडल्ट कॉमेडी कंटेंटसाठी ओळखला जातो.या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींना परीक्षक म्हणून बोलावण्यात येतं. आलेल्या स्पर्धकांवर जोक्स मारणं, त्यांची खिल्ली उडवणं, अश्लील कमेंट्स करणं, शिव्या देणं… हे सगळं या शोचा भाग. शो युट्यूबवर असल्यानं यावर बंधनं नव्हती. पण रणवीरनं या सगळ्याची हद्द पार करत स्पर्धकाला आई-वडिलांबद्दल अतिशय संतापजनक असा प्रश्न विचारला.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीका झाली. अतिशय अश्लील भाषेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध वेगवेगळ्या स्तरांतून कारवाईची मागणी होऊ लागली. काहींनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #IndiasGotLatent#RanveerAlahabadia#SamayRaina
Previous Post

ममता कुलकर्णीचं नक्की काय चाललंय?

Next Post

कोकणात ठाकरेंचे बुरुज एकापाठोपाठ ढासळू लागले!

Next Post
कोकणात ठाकरेंचे बुरुज एकापाठोपाठ ढासळू लागले!

कोकणात ठाकरेंचे बुरुज एकापाठोपाठ ढासळू लागले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.