DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

ठाकरेंच्या आदेशाने एकाच वेळी तिघांना बाहेरचा रस्ता.

DD News Marathi by DD News Marathi
February 15, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

रत्नागिरी प्रतिनिधी :
दि. १५ फेब्रुवारी २०२५

एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गळती लागली असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिघा शिलेदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत एकूण तिघा जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सचिव विनायक राऊत यांच्या सहीचे पत्रक जारी करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरे गटाला मोठे हादरे बसले आहेत. नुकतेच माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. कोकणात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरु झाल्याची चर्चा असतानाच, आता पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे, असे परिपत्रकात लिहिले आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचा आज प्रवेश होत आहे. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो, तर तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील. १५० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आमच्याकडे येतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #EkanathShinde#shivasenaubt#UddhavThackeray
Previous Post

प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने ‘छावा’ चित्रपट पाहावा!

Next Post

‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटून काढणार – देवेंद्र फडणवीस!

Next Post
‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटून काढणार – देवेंद्र फडणवीस!

‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटून काढणार - देवेंद्र फडणवीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.