DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटून काढणार – देवेंद्र फडणवीस!

फडणवीसांचा जबरदस्त निर्णय! यूपीप्रमाणे २० वर्षांच्या जेलची तरतूद?

DD News Marathi by DD News Marathi
February 15, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटून काढणार – देवेंद्र फडणवीस!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ फेब्रुवारी २०२५

आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अन्य राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी, तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे.

अन्य राज्यांच्या कायद्याचा अभ्यास करणार
राज्यात मागील काही वर्षांत आंतरधर्मीय विवाहावरून ‘लव्ह जिहाद’च्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी नागरिकांकडून, विशेषतः हिंदुत्ववादी संघटनांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने अन्य राज्यांनी केलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीत महिला आणि बालविकास, अल्पसंख्यांक विकास, विधी आणि न्याय, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव आणि सचिव, तसेच गृहविभागाच्या विधी शाखेचे सहसचिव किंवा उपसचिव हे सदस्य असतील.

काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदे केले आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींबाबत उपाययोजना सुचवणे, अन्य राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करून राज्य सरकारला शिफारस करणे, तसेच कायदेशीर बाबी तपासणे अशी जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

ऑक्टोबर २०२४ मध्ये, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की लव्ह जिहादच्या एक लाखाहून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार, बनावट ओळखपत्र वापरुन पुरूषांनी हिंदू महिलांना लग्नाचे आमिष दाखवले होते. “दशकभरापूर्वी आम्हाला वाटायचे की लव्ह जिहाद ही एक वेगळी घटना आहे, पण तसे नाही; हिंदू महिलांना पळून जाऊन इतर धर्माच्या पुरुषांशी लग्न करण्यास प्रवृत्त केल्याच्या एक लाखाहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे प्रेमाचे कृत्य नाही तर एक सुनियोजित कट आहे आणि ते लव्ह जिहाद आहे. आपल्या धर्मातील महिलांना फसवण्याचा आणि लुबाडण्याचा हा एक मार्ग आहे” असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

लव्ह जिहादबाबतचा कायदा सर्वप्रथम उत्तर प्रदेशात बनवण्यात आला. दोषी व्यक्तीला २० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि आसाममध्येही लव्ह जिहादविरुद्ध कायदे करण्यात आले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#lovejihad#UttarPradesh#yogiadityanath
Previous Post

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

Next Post

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली!

Next Post
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.