DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गुनाट गावात कोणाचा सत्कार होणार?

एक लाखाचं बक्षीस नेमकं कुणाला मिळणार?

DD News Marathi by DD News Marathi
March 1, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
गुनाट गावात कोणाचा सत्कार होणार?

पुणे प्रतिनिधी :
दि. ०१ मार्च २०२५

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला काल मध्यरात्री अखेर अटक करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. आरोपीच्या शोधासाठी जाहीर करण्यात आलेले एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला मिळणार, हेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?
स्वारगेट एसटी डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हे पथक पुरावे गोळा करेल. यासाठी विशेष वकील दिला जाणार असून जलदगती न्यायालयात केस चालवणार आहोत. या घटनेनंतर शहरातील महिला सुरक्षेशी संबंधीत सेफ्टी ऑडिट करण्यात येत आहे. नव्याने काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. निर्जन स्थळं, टेकड्या, रेल्वे स्टेशन, डार्क स्पॉट यांचं सेफ्टी ऑडिट होईल. पोलिस पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

आरोपीला अटक करण्यात नक्कीच उशीर झाला, अशी कबुली यावेळी पोलिसांनी दिली. खरं तर पहिल्याच दिवशी फिर्याद आल्यानंतर दीड ते दोन तासात विविध पथकं स्थापन केली गेली. एसटी डेपोच्या आतील २३ आणि बाहेरील ४८ सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करुन आरोपी निष्पन्न करण्यात आला.

आमचं पथक दुपारी दोन वाजता गुनाट गावात पोहोचलं. गुनाट गावातील नागरिकांचे विशेष आभार, आम्ही स्वतः त्या गावात जाऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या लोकांचं अभिनंदन करणार आहोत. आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला एक लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आरोपीच्या भावाचेही विशेष आभार. ही पोलिसांची एकत्रित कामगिरी होती, आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

आरोपीच्या शोधासाठी पाचशे पोलीस तैनात होते. आरोपीवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याने स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा यापूर्वी केल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डला नाही. आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. दोरी तुटल्याने त्याचा प्रयत्न फसला. त्याच्या गळ्यावर व्रण आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर खरे समोर येईल, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. स्वारगेट एसटी स्थानकाचे पोलिसांनी सेफ्टी ऑडिट केले आहे. त्यानुसार एसटी प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattaGade#SwargateRapeCase#SwargateSTstand
Previous Post

नराधम गाडेकडून तीनदा आत्महत्त्येचा प्रयत्न!

Next Post

दत्ता गाडेचा अक्षय शिंदेसारखा एन्काऊंटर होणार?

Next Post
दत्ता गाडेचा अक्षय शिंदेसारखा एन्काऊंटर होणार?

दत्ता गाडेचा अक्षय शिंदेसारखा एन्काऊंटर होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.