DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

म्हणाले, "धनंजय मुंडे यांना मुक्त केलंय!"

DD News Marathi by DD News Marathi
March 4, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ मार्च २०२५

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंकडे सध्या महाराष्ट्र सरकारमधील अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. काल रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली होती. त्यामध्ये यावर निर्णय झाल्याची माहिती आहे.

“मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा सोपवला, मी तो स्वीकारला आहे. पुढील कारवाईसाठी मी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना मुक्त करण्यात आलं आहे,” अशी मोजक्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

मी फेसबुकवर तारीख दिल्याप्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कालच जाहीर करतील असं वाटलं होतं. कारण दोन दिवस आधीच राजीनामा घेतला आहे. मात्र आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. क्रूर वृत्ती, मंत्रिपदाचा गैरवापर करुन मला त्रास देत आहेत. मृत व्यक्तींच्या नावे मतदान करुन धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मी निवेदन दिलंय, की धनंजय मुंडेंना शपथ घेऊ देऊ नका, ते क्रूर आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे यांचं खरं रुप समोर आलं, असं करुणा शर्मा याआधी म्हणाल्या होत्या.

“संतोष देशमुखांच्या मृत्यूनंतर चेहऱ्यावर लघुशंका करत मारेकरी हसत आहेत, फोटो काढत आहेत. हे सर्व वाल्मिक कराड व्हिडिओ कॉलवर बघत होता. त्याची काय मानसिकता आहे? ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर आहे. जर मृतांसोबत असं वागतात, तर जिवंत आहेत, त्यांच्यासोबत कसं वागतील? दोषींना फाशी व्हावी, ही त्यांचीच मागणी होती, आमची नाही, किमान त्यांची मागणी तरी पूर्ण करा,” असं करुणा शर्मा पुढे म्हणाल्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#DevendraFadanavis#dhananjaymunde#DhananjayMundeResigns#KarunaMunde#Maharashtra#SantoshDeshmikh#valmikkarad
Previous Post

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा!

Next Post

पाच वर्षांत बीड जिल्ह्यात २७६ हत्या!

Next Post
पाच वर्षांत बीड जिल्ह्यात २७६ हत्या!

पाच वर्षांत बीड जिल्ह्यात २७६ हत्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.