पुणे प्रतिनिधी :
दि. १० मार्च २०२५
पुण्यातील एफ सी रस्त्यावर एका तरुणावर चाकूने वर केल्याची घटना रविवारी (९ मार्च) रात्रीच्या वेळी घडली. चॅम्पियन ट्रॉफीचा जल्लोष सुरू असताना पुण्यात एका टोळक्याने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय संघाच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष सुरू होता. अशातच पुण्यातील एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ४ ते ५ जणांनी चाकू, बेल्टने या तरुणाला मारहाण केली. मारहाण करत या तरुणाला गंभीर जखमी केलं. जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यानंतर मारहाण करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाणीचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.