पुणे प्रतिनिधी :
दि. ११ मार्च २०२५
काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. धंगेकर सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद शिंदेंनी धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ससून, पब, ड्रग्स ही सगळी आंदोलनं त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच केली यात कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता. असा काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा मोठा दावा आहे. हा पुण्यातील वाल्मिक कराड असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
ज्याची विचारधारा शून्य त्यावर बोलणार नव्हतो, पण पक्ष कुठंच कमी पडला नाही. चारवेळा संधी दिली तरी गेले, मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने ३ वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ४ वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आले काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाहीत. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे, त्यांना लीड घेता आलं नाही. पक्षाने माझ्यासाठी काम करावं, मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही, काहीच नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत. आम्ही पक्षाला सांगितल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत असं सांगितल होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते. विचारधारा नाही, यांना एका पार्टीची लाईन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, पक्षाने मात्र बदल केला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात. यांनी काही केलं नाही. एक नगरसेवक केला नाही. आम्हाला दुःख की अशा नाकर्त्यावर आम्ही विश्वास ठेवला, केवळ मतलबी राजकारण केलं. त्यांच्या टेंडर मध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडल्याचा आरोप शिंदेंनी केला.
वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींच नाव कुठं नाही. स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण केलं, त्यांच्यामुळे पक्षाला फायदा कधीच झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते, असं अरविंद शिंदे म्हणाले.