DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार!

हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय.

DD News Marathi by DD News Marathi
March 12, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश, राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १२ मार्च २०२५

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली आहे. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.

पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी ही घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत विविध देशांकडून २१ पुरस्कार मिळाले आहेत.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले की, ते मला त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. मी त्यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारू इच्छितो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे.”

मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी सांगितले की, १२ मार्च १९९२ रोजी मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून पाच परदेशी मान्यवरांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान १९९८ मध्ये नेल्सन मंडेला हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी बार्बाडोस, गयाना, रशिया, भूतान, फ्रान्स, इजिप्त आणि अमेरिका या देशांकडून सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते पोर्ट लुईस येथे पोहोचले. उद्या, १२ मार्च रोजी होणाऱ्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात भारतीय नौदलाच्या जहाजासह भारतीय संरक्षण दलाची एक तुकडीही सहभागी होणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Mauritius#MauritiusHighestAward#NarendraModi#theGrandCommander_of_the_Order_of_the_Star_and_Key_of_the_IndianOcean
Previous Post

कोरटकर अधिकच अडकत चालला!

Next Post

पुणे स्वारगेट डेपो प्रशासन अजूनही झोपलेलेच!

Next Post
पुणे स्वारगेट डेपो प्रशासन अजूनही झोपलेलेच!

पुणे स्वारगेट डेपो प्रशासन अजूनही झोपलेलेच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.