DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

७ जणांविरोधात गुन्हा दाखल.

DD News Marathi by DD News Marathi
March 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

बीड प्रतिनिधी :
दि. १३ मार्च २०२५

बीडच्या बाबुळगावचे सरपंच दादासाहेब खिंडकर यांनी गावातीलच ओमकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केली होती.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूरपणे झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर बीडमधील विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचे अनेक व्हिडीओ समोर आले. दरम्यान संतोष देशमुख यांचा नातेवाईक असलेल्या दादासाहेब खिंडकर यांनी देखील एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

दादासाहेब खिंडकर संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांच्या वतीने बाजू देखील मांडत होते. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. याप्रकरणी आता दादासाहेब खिंडकरांसह सात आरोपींवर 307 आणि किडनॅप केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या बाबुळगावचे सरपंच दादासाहेब खिंडकर यांनी गावातीलच ओमकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केली होती. मागील वर्षी ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. मात्र या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. दादासाहेब खिंडकर ओमकार सातपुतेला काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

ओमकार सातपुते याने मारहाण प्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादासाहेब खिंडकर सह इतर 7 जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला आहे. त्याचबरोबर किडनॅप केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी ही माहिती दिली आहे. आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#Crime#CrimeinBeed#DadasahebKhindkar#OmkarSatpute#santoshDeshmukh
Previous Post

“तुमच्या शब्दाला मान दिला, आता मला न्याय मिळावा”

Next Post

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला!

Next Post
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला!

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.