DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला!

स्कूटरवर बसून पळ काढला.

DD News Marathi by DD News Marathi
March 15, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला!

नाशिक प्रतिनिधी :
दि. १५ मार्च २०२५

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केलं आहे, मात्र त्याचा कसलाही पत्ता लागलेला नाही. अशातच नाशिक येथे सहदेवनगरमधील आनंद हाईट्सजवळ एका मंदिराजवळ कृ्ष्णा आंधळे याला पाहिल्याचा दावा वकील गितेश तानाजीराव बनकर यांनी केला आहे.

सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मी दत्त मंदिराजवळ आलो. तिथे एका झाडाजवळ मला दोघे दिसले. त्यातील एकाने मास्क खाली केल्यावर मला चेहरा दिसला. १०० टक्के सांगतो तो कृष्णा आंधळेच होता, दुसऱ्या मिनिटाला मी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये फोन करत माहिती दिली. दोघे त्यानंतर मखमलाबादच्या दिशेने गेले. मी एक वकील असून गेल्या १८ वर्षांपासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करत असल्याने गुन्हेगाराला कसं ओळखायचं हे मला चांगलं माहित असल्याचं वकील गितेश बनकर यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे नाशिकमध्ये मागील महिन्यातही एका मंदिरात कृष्णा आंधळे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र ती अफवा असल्याचं निदर्शनास आलं होतं. आता बनकर यांनी आंधळे दिसल्याचा दावा केल्याने पोलिसांना कसून तपास करावा लागणार आहे. गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस आता त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पळून गेलेला नेमका कोण होता? याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कृष्णा आंधळे हा गेल्या दोन वर्षांपासून फरार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सुदर्शन घुलेसह त्याच्यासोबत एकाला पुण्यामधून अटक करण्यात आली होती. आता सर्व आरोपींवर आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. मात्र कृष्णा आंधळे याला पकडण्याता पोलिसांना अपयश आलं होतं. पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आहे मात्र तरीही त्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही. आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंधळे याचा मर्डर झाला असावा असा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र अधिकृत कोणतीही माहिती त्याच्याबाबत समोर आलेली नाही. नाशिक पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. जर तो कृष्णा आंधळेच असेल तर त्याला पकडण्यासाठी पोलीस आपली सर्व ताकद पणाला लावतील.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Absconding#KrushnaAndhale#Nashik#santoshDeshmukh
Previous Post

धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

Next Post

दिल्लीला पाठवलेल्या तीन नावांमध्ये जोशींचं नाव नव्हतं?

Next Post
दिल्लीला पाठवलेल्या तीन नावांमध्ये जोशींचं नाव नव्हतं?

दिल्लीला पाठवलेल्या तीन नावांमध्ये जोशींचं नाव नव्हतं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.