DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भाजपच्या विधानपरिषदेसाठी यादीवर फडणवीसांचा पगडा!

माधव भंडारींना पुन्हा डावलल्याची चर्चा.

DD News Marathi by DD News Marathi
March 17, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपच्या विधानपरिषदेसाठी यादीवर फडणवीसांचा पगडा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ मार्च २०२५

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. पुन्हा एकदा पक्षाने ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना दुर्लक्षित केल्याचे दिसते. सोशल मीडियावरही यावरुन भाजपला डिवचले जात आहे.

येत्या २७ मार्च रोजी पाच जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या दोन्ही पक्षांकडून कुणाला उमेदवारी दिली जाते. याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाच जागांसाठीची ही निवडणूक स्वतंत्र होणार असल्याने ती बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने रविवारी ही नावे जाहीर केली असून, या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. २७ मार्च रोजी मतदान होईल.

फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत, जेव्हा माधव भंडारी यांना वगळण्यात आले होते, तेव्हा त्यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “माझे वडील जनसंघात सामील झाले होते, त्याचा पुढे भाजप झाला. या ५० वर्षांत त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात संघटना उभारण्यास मदत केली आहे” असे ते म्हणाले होते. आपल्या वडिलांचे नाव विधानसभा किंवा वरिष्ठ सभागृहासाठी १२ वेळा स्पर्धेत पाहिल्याचे म्हटले होते. माझ्या वडिलांची कारकीर्द शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना योग्य बक्षीस मिळेल अशी आशा त्यावेळी चिन्मय भंडारींनी व्यक्त केली होती. त्यामुळे यावेळी माधव भंडारींना सामावून घेतले जाईल अशी चर्चा होती. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत, ते नागपूर महानगरपालिकेत चारवेळा नगरसेवक होते. पदवीधर मतदारसंघातून लढलेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांना संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे पक्षाकडून आता त्यांना विधान परिषदेत संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले गेल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील माजी आमदार दादाराव केचे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पक्षाने त्यांचेही पुनर्वसन केले आहे. केचे हे आर्वी मतदारसंघातून विधानसभेवर दोनवेळा निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारून सुमित वानखेडे यांना उमदेवारी देण्यात आली. त्यामुळे केचे काहीसे नाराज होते व बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर केचे यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारी देण्याची ग्वाही देण्यात आल्याची चर्चा होती. तर, संजय केणेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. भाजपसाठी बूथपातळीपासून काम केलेल्या केणेकर यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

या पोटनिवडणुकीत विजय प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना अवघ्या वर्षभराचाच कालावधी मिळणार आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर यांना विजय मिळाल्याने त्यांनी परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. या तिघांचा विधान परिषदेतील कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे.

अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यास त्यांना थोडा अधिक कालावधी लाभणार आहे. आमशा पाडवी यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत शिल्लक आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कालावधी २७ जुलै २०३० पर्यंतची आमदारकी आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू असून सोमवारी अखेरच्या दिवशी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AseemblyByPolls#DevendraFadnavis#MadhavBhandari
Previous Post

दिल्लीला पाठवलेल्या तीन नावांमध्ये जोशींचं नाव नव्हतं?

Next Post

हिंसाचाराने नागपुरात तणाव!

Next Post
हिंसाचाराने नागपुरात तणाव!

हिंसाचाराने नागपुरात तणाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.