DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नागपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात!

घटनेचं मूळ कारण काय होतं?

DD News Marathi by DD News Marathi
March 18, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नागपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात!

नागपूर प्रतिनिधी :
दि. १८ मार्च २०२५

नागपुरात सोमवारी रात्री तणाव निर्माण होऊन दगडफेक, जाळपोळ झाली होती. त्यानंतर शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. नागपूरची परिस्थित सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी प्रतिक्रिया दिली.

योगेश कदम काय म्हणाले?
सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे. काही ठिकाणी गाड्यांचं, दुकानांचं, घरांचं नुकसान झालं आहे. लोक काही घरांमध्ये घुसले होते. अशा गंभीर बाबतीत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या दाव्याबद्दल माहिती घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की रात्री दहा वाजता नागरिकांकडून स्थानिक पीआयना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तो झाला नाही. याचं कारण समोर आलं नाही, पण या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं.

सकाळच्या वेळी एक आंदोलन झालं, कुठलाही वादविवाद न होता दुपारी काही जण पोलीस स्थानकात जमा झाले होते, त्यांचं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं, वाद तेव्हाच मिटला होता. दुपारी चार-पाच तासांनंतर काही जणांनी प्लॅनिंग केलं असावं, असा अंदाज आहे, मात्र खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. घर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले, याचं कुठून आणि कोणी प्लॅनिंग केलं, याची चौकशी करण्यात येईल, असंही कदम म्हणाले.

हिंसाचाराचं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र ४७ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. १२-१४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २-३ सामान्य नागरिक जखमी आहेत. या घटनेचं मूळ कारण शोधून काढणार, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Aurangzeb#NagpurViolence#YogeshKadam
Previous Post

हिंसाचाराने नागपुरात तणाव!

Next Post

जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारताने ३३ पदके जिंकली! पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!

Next Post
जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारताने ३३ पदके जिंकली! पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!

जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारताने ३३ पदके जिंकली! पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.