पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ३१ मे २०२१
सामाजिक सेवा प्रतिष्ठान व चित्रपट कला सांस्कृतिक विभाग पर्वती मतदार संघाच्या उपाध्यक्षा रूपाली हेमंत वांबुरे यांच्या वतीने स्वामी नारायण मंदिर, टेकडीवर वृक्षरोपण आणि श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या तर्फे पुणे शहरात दरवर्षी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
जेव्हा होईल झाडांमधे वृध्दी, तेव्हांच वाढेल जीवनात समृध्दी हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेऊन आयोजित केलेला हा वृक्षरोपण चा कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला. या प्रसंगी, वैशालीताई गायकवाड, अश्विनीताई वाघ, वैशालीताई ढेबे, गिरीजाताई पवार, कविताताई अबनावे, मनिषाताई राऊत, सुशीलाताई गुंजाळ, दिपालीताई कवडे, डॉ.जोशी मॅडम,विद्या लाटे-कांबळे, काजल माने, रूपा निरुखे, पिंकी तिलोक चंदाणी, समीना शेख, अर्चना जाधव, मानसी गायकवाड, निकिता यादव, मोहनिश जाधव, योगेश कानडे, हेमंत वांबुरे, दिलीप मोरे, मंगेश गांधी, आकाश जाधव, अतुल जाधव, मदन धायरे, निशान नगरकर, डॉ.गणेश ताठे, निशान नगरकर व केतन यादव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृक्षलागवड आणि श्रमदान केले.
या उपक्रमाविषयी बोलताना, रुपाली वांबुरे म्हणाल्या, “आजच्या कोरोना काळात आम्ही सर्वांनी हे अतिशय महत्वाचे छान काम केले आहे. आज आम्ही लावलेल्या रोपांचे उद्या वटवृक्षांत रूपांतर होईल आणि येणाऱ्या भविष्यात हीच झाडे आपल्या करीता ऑक्सिजन देण्याचे काम करतील. आमचा आदर्श घेऊन प्रत्येकाने एक जरी रोप लावले आणि ते दत्तक घेतले तर येणाऱ्या भविष्यात ऑक्सिजनची गरज भासणार नाही.”