मुंबई प्रतिनिधी :
दि. २० मार्च २०२५
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानंतर आता मोठी खळबळ निर्माण झालीये आणि नवीन वादाला तोंड फुटले आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. सतीश सालियन यांनी एक याचिका देखील दाखल केलीये. नितेश राणे हे दिशा सालियन प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता, असेही म्हटले.
दिशाच्या पालकांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यावर आरोप केले. दिशा सालियन हिच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर आता या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीये. किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, दिशा सालियनच्या वडिलांनी काहीही आरोप करो, पण मी त्यावेळी त्यांच्या घरी गेले होते. हेच नाही तर मी उघडपणे त्यांच्या घरी गेले होते. यावेळी काही माध्यमे देखील होती. माझी तिच्या पालकांशी चर्चाही झाली होती.
यावेळी आमच्यामध्ये बऱ्याचवेळ चर्चा झाली होती. मुळात म्हणजे आता महानगरपालिका निवडणूक असल्याने असे आरोप होत आहेत. एक आरोप केला की, दुसरा लगेचच. यासोबतच दिशा सालियनच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा करताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, तिच्या वडिलांनी मला अनेकदा लेखी दिले आणि त्यांचे फोनही येत ते मला महापौर बंगल्यावर भेटण्यास आल्याचे देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर म्हटले होते की, दिशाच्या वडिलांनी ही नावे आता दिली आहेत. मी पहिल्या दिवसांपासून हेच तर सांगत होतो. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे, यामुळे मोठी खळबळ निर्माण झालीये. यासोबतच मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या याचिकेमुळे आता राजकारण हे परत एकदा तापताना दिसत आहे.