DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नागपूर दंगलीनंतर NIA चं पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल!

प्रशासन अलर्टमोडवर. औरंगजेब कबरीचा वाद.

DD News Marathi by DD News Marathi
March 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नागपूर दंगलीनंतर NIA चं पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. २१ मार्च २०२५

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये आंदोलनानंतर दंगल झाली. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता एनआयएची(NIA) टीम छत्रपती संभाजी नगर शहरात दाखल झाली आहे. कबर असलेल्या खुलताबाद शहरासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, बीड, उदगीर या ठिकाणी देखील एनआयएचं बारीक लक्ष असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे आहे. ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांसह विविध हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी केली आहे. यानंतर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने अल्टिमेटम देत महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केली. यात नागपूर येथे आंदोलनानंतर रात्री दंगल उसळली. औरंगजेबाची कबर व नागपूर येथे झालेली दंगल या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. या टीमकडून छत्रपती संभाजीनगरसह खुलताबाद येथील हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, जालना, उदगीर या जिल्ह्यांमध्ये देखील प्रत्येक हालचालींवर एनआयएची तीन विशेष पथकं लक्ष देत आहेत. तसेच मराठवाड्याला लागून असलेल्या विदर्भात बुलढाणा या जिल्ह्यात देखील या टीमचे विशेष लक्ष आहे.

एनआयएची टीम मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष देत असताना ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष देत आहे. या परिसरामध्ये तपास यंत्रणांचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, नागपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज(२१ मार्च) शुक्रवारच्या नमाजनिमित्त शहरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दंगलीनंतर नागपुरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा पाहायला मिळत आहे. शहरात पुन्हा तणाव होऊ नये यासाठी नागपूर पोलीस सतर्क आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Aurangazeb#chhatrapatisambhajinagar#NagpurViolence#NIA
Previous Post

दिशा सालियनच्या पालकांचा खळबळजनक दावा! याचिकेत आदित्य ठाकरेंचे नाव!

Next Post

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले. प्रशासन ॲक्शन मोडवर!

Next Post
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले. प्रशासन ॲक्शन मोडवर!

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले. प्रशासन ॲक्शन मोडवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.