पुणे प्रतिनिधी :
दि. २२ मार्च २०२५
हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला मोठी आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. धक्कादायक म्हणजे ही आग बसच्या चालकानेच लावल्याचा खुलासा झालाय. ट्रॅव्हल्सचा चालक जनार्दन हंबर्डीकरनेच हा सर्व आगीचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. हैराण करणारे म्हणजे याच ट्रॅव्हल्स बसमध्ये हंबर्डीकर यांचे भाऊजी देखील प्रवास करत होते, यामुळे आता विविध चर्चांना उधाण झाले. जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीने मोठा दावा केला आहे.
या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतानाच आता हंबर्डीकरांच्या कुटुंबियांकडून वेगळाच दावा केला जात आहे. जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना माझ्या पतीला गोवले जात असल्याचे म्हटले. जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नी नेहा हंबर्डीकर यांनी म्हटले की, कोणी आपल्या बहिणीच्या पतीचा जीव धोक्यात घालेल का? ज्या बसला आग लागली आहे, त्या बसमध्ये त्यांचे भाऊजी होते. काही जण या घटनेनंतर सुखरूप बाहेर पडले, त्यांच्या अंगावर साधी जखम नसल्याचा दावा नेहा हंबर्डीकर यांनी केला.
बस पेटवून देण्याच्या एकदिवस अगोदरच चालकाने दिली होती धमकी, मोठी माहिती पुढे, एकेएकाची वाट लावतो म्हणत…
पेटत्या बसमधून हे लोक बाहेर कसे आले?. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांच्याकडे पैसेच नसते तर त्यांनी मला पैसे कसे दिसले असते. जे काही सर्व सांगितले जात आहे ते खोटे आहे. या प्रकरणाचा योग्य तपास व्हायला पाहिजे, असेही नेहा हंबर्डीकर यांनी म्हटले आहे. दिवाळीला जनार्दन हंबर्डीकर यांचा पगार कापल्या गेल्याचाही दावा खोटा असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
या आगीच्या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वात अगोदर बसमधून चालक जनार्दन हंबर्डीकर उतरताना दिसतोय. त्यानंतर पाठोपाठ अजून काही लोकांनी बसमधून उड्या मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. आरोपी जनार्दन हंबर्डीकर याने बसमध्ये आग का लावली? याबद्दल खुलासा केलाय. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि सर्व प्रकार उघडकीस झाला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.