DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

एका चुकीनं हिंजवडी हत्याकांडाचा झाला पर्दाफाश!

पोलिसांची चक्रं वेगानं फिरली आणि...

DD News Marathi by DD News Marathi
March 22, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
एका चुकीनं हिंजवडी हत्याकांडाचा झाला पर्दाफाश!

पुणे प्रतिनिधी :
दि. २२ मार्च २०२५

पुण्याच्या हिंजवडी येथे धावत्या मिनीबसला आग लागून त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत बाहेर न पडू शकल्याने चौघांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, ज्याला अपघात म्हटलं जात होतं तो अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचं समोर आलं आणि पुण्यात एकच खळबळ माजली. पोलिसांच्या तपासात या मिनी बसच्या चालकानेच ही आग लावल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला (वय ५६) ताब्यात घेतलं आहे. त्याने याची कबुली दिली असून कर्मचाऱ्यांचा राग आल्याने त्याने ही भयंकर घटना घडवून आणल्याचं सांगितलं.

बुधवारी (१९ मार्च) सकाळच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडी येथे एका मिनी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात मिनी बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर या आगीत अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांचा तर अक्षरश: कोळसा झाला. या घटनेत गाडीचा चालक आणि पाच जण जखमी झाल्याचीही महिती होती. या आगीच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरुन गेलं होतं. मात्र, जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांच्यासमोर वेगळीच कहाणी आली. गाडीचा चालक जनार्दनचा दिवाळीचा पगार त्याच्या मालकाने कापला होता. तसेच, गाडीतील काही कर्मचाऱ्यांनी डबा खाऊ दिला नसल्याने त्याला राग आला आणि त्यातून त्याने हे केल्याचं समोर आलं.

पोलिसांना चालकावर संशय कसा आला?

घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जनार्दन हंबर्डीकरला भाजल्यामुळे झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. किरकोळ जखमी असूनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचं नाटक करत होता. हे तिथे उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या लक्षात आले. जेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडे या घटनेबाबत चौकशी केली तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. तेव्हा घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक गाडीच्या सीटखाली काहीतरी पेटवत असल्याचं निदर्शनास आलं. तसेच, आग लागताच हंबर्डीकर हा गाडीतून उतरल्याचंही या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

त्यामुळे पोलिसांनी जनार्दन हंबर्डीकरची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना जे सांगितलं त्याने साऱ्यांनाच धक्का बसला. कर्मचाऱ्यांचा राग आल्याने गाडीला आग लावून त्यांना मारण्याचा कट रचल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bus#BusFire#Fire#HinjawdiBusaccident#JanardanHambardikar
Previous Post

बंद दाराआड जयंत पाटील-अजित पवारांची अर्धा तास चर्चा!

Next Post

आमिर खानने केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

Next Post
आमिर खानने केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

आमिर खानने केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.