DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये ‘भलतेच उद्योग’!

लॉज चालक महिलेवर गंभीर गुन्हा. ग्राहकांना मुलींचे फोटो-नंबर देत असे.

DD News Marathi by DD News Marathi
March 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये ‘भलतेच उद्योग’!

पुणे प्रतिनिधी :
दि. २४ मार्च २०२५

कल्याणीनगर येथील निवासी भागात असलेल्या एका लॉजमध्ये (Pune Lodge) सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गिडवाणी असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिस तक्रारीत नाव नमूद असूनही सुरुवातीला महिलेवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला नव्हता. आता महिलेसह अन्य दोघांना या प्रकरणी नव्याने आरोपी केले गेले आहे.

कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी लॉज व्यवस्थापक अमोल तांबडे (वय २८, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि एजंट बंटी या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ सह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीत लॉजचालक महिलेच्या नावाचा उल्लेख असतानाही तिच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता.

अटक आरोपी अमोल तांबडे याच्याकडे तपास केला असता, स्प्रिंग बुक लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना गिडवाणी यांच्या सांगण्यावरून मुलींचे फोटो आणि मोबाइल क्रमांक देत होतो. गिडवाणी आणि अन्य दोघांच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना लॉजमध्ये महिला पुरवून वेश्याव्यवसाय केला जात होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात गिडवाणीसह अन्य दोघांना आरोपी करण्यात आले असून, त्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक व्यक्ती गुंतल्या असल्यामुळे ‘भारतीय न्याय संहितेचे कलम १४३ (३) ‘प्रमाणे गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे.

सोनिया गिडवाणी आणि अन्य एका व्यक्तीवर स्प्रिंग बुक लॉजवर ताबा मारल्याप्रकरणी जून २०२३ मध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. लॉजच्या मूळ मालकाने गिडवाणी आणि अन्य एका व्यक्तीला स्प्रिंग बुक लॉज भाडे तत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्याचा कायदेशीर करारही करण्यात आला होता. कराराची मुदत संपल्यावर दोघांनी लॉजचा ताबा मूळ मालकाला दिला नव्हता, भाडे देणेही बंद केले होते, असे या प्रकरणी दाखल गुन्ह्यात नमूद आहे. या लॉजच्या मूळ मालकाला आता तरी न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KalyaniNagar#Prostitution#Prostitution_in_LodgePune
Previous Post

कामराची काहीही चूक नाही! उद्धव ठाकरेंनी घेतली कामराची बाजू!

Next Post

पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

Next Post
पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.