पंढरपुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ३१ मे २०२१
आज कै.आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापुर जिल्ह्यातील युवा नेते भगीरथ भालके यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांच्या समस्या व रेंगाळलेले प्रश्न सोडविण्यासाठी चे निवेदन नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत पंढरपुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
रूग्णवाहिका व शववाहिका, शहरातील व्यापार्यांच्या गाळ्यांचे भाडे आणि नागरिकांचा कर माफीचा प्रस्ताव तात्काळ आयुक्ताकडे देण्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी कबुल करून त्याची प्रत भगीरथ भालके यांना दिली. तसेच 65 एकर येथील हॉस्पिटल मध्ये 50 टक्के बेड नगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय शहरातील दारिद्र रेषेखालील गोरगरीब नागरिक यांना राखीव ठेवण्याचा ठराव ही घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भगीरथ भालके यांनी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना म्हणाले की, ‘पंढरपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न करु शकतो. नगरपालिकेची कोण-कोणती कामे प्रलंबित आहेत त्याची प्रत माझ्याकडे द्या, या विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न आणता मी ती सर्व कामे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मार्गी लावू शकतो.’
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, प्रशांत शिंदे, सुरेश नेहतराव, लखन चौगुले, महादेव धोत्रे, किरणराज घाडगे, सुधीर धुमाळ, अनिल अभंगराव, महंमद उस्ताद, नागेश गंगेकर, सतीश शिंदे, आप्पा राऊत, संजय बंदपट्टे, स्वागत कदम, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सतीशबापू घंटे, सुमित शिंदे, शंकर सुरवसे, सागर पडगळ, संतोष बंडगर, स्वप्निल जगताप, तानाजी मोरे, दादा थिटे, सुरज पावले, राजाभाऊ भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.