DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण आलं समोर!

सुदर्शन घुलेने पोलिसांना दिली मोठी माहिती.

DD News Marathi by DD News Marathi
March 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण आलं समोर!

बीड प्रतिनिधी :
दि. २७ मार्च २०२५

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली, त्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराड गँगच्या तिघांनी संतोष देशमुखांच्या हत्येची कबुली दिली आहे. यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांच्या चौकशीत संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, याप्रकरणातील मास्टरमाईंड समजला जाणारा सुदर्शन घुलेने हत्या का केली आणि कशी केली, हे सारं सविस्तर सांगितलं आहे.

तपासादरम्यान जेव्हा सुदर्शन घुलेने हत्येचा आरोप फेटाळला, तेव्हा पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर त्याने सारं काही सांगितलं. होय, आम्हीच संतोष देशमुखचं अपहरण करुन त्याची हत्या केली, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी आम्हाला मारहाण केली होती. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आम्हाला आव्हानही दिलं होतं. याचा राग डोक्यात होता. आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यातही संतोष देशमुख अडसर ठरत होता. त्यानंतर संतोष देशमुखांचा काटा काढण्यासाठी २९ डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटेसोबत बैठक झाली, अशी माहिती घुलेने तपासात दिली. त्याशिवाय, आरोपी महेश केदारने संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याचं सांगितलं. तसेच, जयराम चाटे यानेही आपल्या आरोपांची कबुली दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा पुरावा कोर्टापुढे मांडला. याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मिक राड आणि विष्णू चाटेला तीनवेळा फोन केला होता. याचा सीडीआर न्यायाधीशांपुढे सादर करण्यात आला. हा एक महत्त्वाचा पुरावा ठरला. आता यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#massajog#santoshDeshmukh#SudarshanGhule#UjjwalNikam#WalmikKaead
Previous Post

बब्बर आडनाव का हटवलं? प्रतीक स्मिता पाटीलनं सांगितलं कारण!

Next Post

येरवडा मनोरुग्णालयात आरोग्य व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड!

Next Post
येरवडा मनोरुग्णालयात आरोग्य व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड!

येरवडा मनोरुग्णालयात आरोग्य व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.