मुंबई प्रतिनिधी :
दि. २७ मार्च २०२५
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला मागील काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर १४ एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर बिश्नोई टोळीकडून गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. पोलिस तैनात असताना देखील हा गोळीबार झाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक केली. त्यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली.
लॉरेन्स बिश्नोई हा जरी जेलमध्ये असला तरीही त्याच्याकडून धमक्या सलमान खानला दिल्या जात आहेत. सलमान खान हा सध्या त्याच्या सिकंदर चित्रपटामुळ चांगलाच चर्चेत आहे. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर बिनधास्त चर्चा केल्याचे बघायला मिळाले. सलमान खान हा म्हणाला की, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत काम मला करायचे असेल तर लोक माझ्या पुढे मोठ्या समस्या आणि कठीण परिस्थिती नक्कीच निर्माण करतील. ते वयातील अंतरावर बोलतील.
मुळात म्हणजे मी हा विचार करून त्यांच्यासोबत काम करतो की, त्यांना पुढे चांगल्या संधी मिळतील. यानंतरही मी त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे सलमान खान याने यावेळी स्पष्ट केले. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत दिसतोय. सलमान खानला मागील काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये.
सलमान खानचा यापूर्वी, ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि शहनाज गिल यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सलमान खान हा मोठ्या संपत्तीचा मालक असून सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.